पालेभाज्या स्थिर, हिरवी मिरची कडाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:17+5:302021-01-18T04:19:17+5:30
अहमदनगर : पालेभाज्यांचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र हिरवी मिरची चांगलीच कडाडली आहे. ठोक बाजारात ४ ते ५ हजार ...
अहमदनगर : पालेभाज्यांचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र हिरवी मिरची चांगलीच कडाडली आहे. ठोक बाजारात ४ ते ५ हजार रुपये क्विंटल, तर किरकोळ बाजारात मिरची शंभर रुपये किलोने विकली जात आहे. शेवगा आणि गवारीच्या शेंगांची आवक कमी झाली असून दोन्ही शेंगांचा ठोक भाव ५ ते ६ हजार रुपये क्विंटल इतका झाला आहे, तर टोमॉटो आणि कांद्याचा दर पुन्हा घसरला आहे.
नगर येथील कृषी उत्पन्न बाजारात रविवारी पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे आढळून आले. हिरवी मिरचीची आवक कमी झाल्याने जागेवर ४ ते ५ हजार रुपय क्विंटल मिरचीला भाव मिळाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हिरवी मिरची १०० रुपयांपर्यंत कडाडली आहे. गवारीच्या शेंगाही बाजारात पहायला मिळत नाहीत. तर शेवगाही महागला आहे. दोन्ही शेंगा ठोक बाजारात ५ ते ६ हजार रुपये क्विंटल असा दर आहे. रविवारी नगर बाजार समितीमध्ये असलेले पालेभाज्यांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.
----
भाज्यांचे सरासरी दर (रुपये प्रतिक्विंटल)
टोमॉटो (५००), वांगी (१७५०),फ्लावर (७५०),कोबी (४००),काकडी (७५०),घोसाळे (२०००),दोडका (३०००), कारले (२०००), भेंडी (२०००), वाल (२२५०),बटाटे (१९००), लसूण (१०,०००), लिंबू (२२५०), गाजर (१२५०), मका कणसे (७५०), वटाणा (२०००), कांदा (१७५७).
---
पालेभाज्यांचे सरासरी दर (रुपये प्रति शंभर गड्डी)
मेथी (१४००), कोथंबिर (१०००), पालक (७५०), शेपू (५००).
---
फळांचे सरासरी दर (रुपये क्विंटलमध्ये)
मोसंबी (२५००), संत्रा (२०००), पपई (५००), द्राक्षे (३५००), सफरचंद (७५००), चिकू (३०००).