नवीन जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:09+5:302021-04-26T04:19:09+5:30

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीला रविवारी शिंगवे येथे गळती लागली असून, दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेतले जाणार ...

Leakage to new aqueduct | नवीन जलवाहिनीला गळती

नवीन जलवाहिनीला गळती

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीला रविवारी शिंगवे येथे गळती लागली असून, दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी ज्या भागाला मंगळवारी पाणी येते, त्या भागाला बुधवारी पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम सोमवारी मध्यवर्ती भागाला पाणीवाटप केल्यानंतर दुपारी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास अवधी लागणार आहे. त्यामुळे सोमवारी शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही. परिणामी मंगळवारी झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, या भागाला बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली गेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवी पेठ, माणिक चौक या भागाला बुधवारऐवजी गुरुवारी पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Leakage to new aqueduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.