Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र

By शेखर पानसरे | Published: May 23, 2023 06:48 PM2023-05-23T18:48:38+5:302023-05-23T18:49:45+5:30

Balasaheb Thorat: उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे.

Leave the water of the people's rights immediately, inaugurate when you get the opportunity, Balasaheb Thorat's letter | Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र

Ahmednagar: जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, बाळासाहेब थोरातांचे खरमरीत पत्र

- शेखर पानसरे
संगमनेर : उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. नवीन कालव्यातून दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा, सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा. असे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळवंडे धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बुधवारी (दि. १७) आयोजीत कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो. मात्र, केवळ पंतप्रधान नरेद्र मोदी यांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.

निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे, त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे, शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहीत आहे. त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे. असेही पत्रात म्हटले आहे.

Web Title: Leave the water of the people's rights immediately, inaugurate when you get the opportunity, Balasaheb Thorat's letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.