मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 04:55 PM2018-11-29T16:55:17+5:302018-11-29T16:55:24+5:30

मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे

The left canal off of the mullah dam | मुळा धरणाचा डावा कालवा बंद

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा आज बंद करण्यात आला आहे. ६१४ दलघफु पाण्याचा वापर करण्यात आला असून २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. रब्बीसाठी सोडण्यात आलेले हे शेवटचे आवर्तन २८ दिवस सुरू होते.
मुळा डाव्या खालव्याखाली ऊस, कांदा, हरभरा, गहू व चारा पीके यांच्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला़ शेवटचे आवर्तन असल्याने डाव्या कालव्याखाली ऊसाच्या लागवडी झाल्या नाहीत. डाव्या कालव्याच्या पाण्याचा विषय संपल्याने शेतक-यांची भिस्त विहीरींच्या पाण्यावर आहे.  कालव्याच्या वरील भागात सध्या अवर्तनामुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र पुर्व भागातील विहीरींनी तळ गाठला आहे.
डाव्या कालव्याचे आवर्तन संपल्याने विहीरींच्या पाण्यावर पीक वाचविणे हे शेतक-यांपुढे आव्हान आहे़ पुर्व भागातील विहीरींचे पाणी फेबुवारीपर्यंत टिकण्याची शेतक-यांना अपेक्षा आहे़ यंदा डाव्या कालव्याखाली खरीप व रब्बी असे दोन अवर्तन मिळाले आहेत. २८ सहकारी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून रब्बीच्या पीकांना पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. मुळा डाव्या कालव्याखाली असलेला बारागाव नांदुर येथील हवरी ओढयावरील एक बंधारा पाण्याने भरला आहे. भागडा चारीच्या तिनही विद्युुत मोटारी बंद पडल्या़ त्यामुळे बारा दिवस पाण्याचे आवर्तन सुरू राहीले़. त्यामुळे ६० पैकी २० बंधारे पाण्याने भरण्यात आले आहे. शॉर्ट सर्कि टमुळे विद्युुत मोटारी बंद पडल्या होत्या़ गोदावरी जल विद्युुत प्रकल्प संगमनेर यांच्या ताब्यात हे पंपहाऊस आहेत.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यासाठी मंजुर असलेले पाणी रब्बी आवर्तनसाठी वापरण्यात आले़ २८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. डाव्या कालव्याचा पाण्याचा कोटा संपला आहे़ डाव्याचे आवर्तन २८ दिवस सुरू होते़.- विकास गायक वाड, शाखा अभियंता मुळा डावा कालवा

 

Web Title: The left canal off of the mullah dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.