मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:07 PM2020-03-20T17:07:02+5:302020-03-20T17:08:06+5:30

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

Left the canal on the right canal; Area of 3,000 hectares will come under Olita | मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 
मुळा धरणातूनपाणी कधी सुटणार? यासंदर्भात शेतक-यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी पाणी सोडल्याने उजव्या कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. मुळा धरणात सध्या २० हजार ११ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. येत्या ४० दिवसात सर्वसाधारण ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणाचे कालवे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्याला भराव टाकणे, गेट दुरूस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत. या टप्प्यात उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यावर शेतकरी विद्युत मोटारी टाकून पाणी उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत मोटारी व पाईप ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत पाटबंधारे खाते आहे. पाटबंधारे खात्याने रात्रंदिवस भरारी पथक तैनात केले आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २ हजार ५०० क्युसेकने सुरू आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले असले तरी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता पाटबंधारे खात्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शेतक-यांनी पाणी वाया जाऊ न देता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे. 
 

Web Title: Left the canal on the right canal; Area of 3,000 hectares will come under Olita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.