न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:29+5:302021-02-23T04:32:29+5:30
जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ॲड. सुभाष काकडे, ॲड. महेश ...
जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ॲड. सुभाष काकडे, ॲड. महेश काबरा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्या. देशपांडे म्हणाल्या की, मोटार वाहन अपघात झाल्यानंतर न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी विधी सेवा प्राधिकरणाकडे पूर्व प्रकरण दाखल करता येऊ शकते, तसेच नुकसान भरपाईसाठी जिल्हा न्यायालयात जखमी व मृत अशा दोन प्रकारचे दावे दाखल करता येतात. अपंगत्व आलेल्या अथवा मृत झालेल्या व्यक्तीच्या उत्पादनाचा, वयाचा व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कौटुंबिक जबाबदारीचा विचार करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांनी प्रास्तावना केले. यावेळी ॲड. काकडे, ॲड. काबरा यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्राधिकरणचे लिपिक भारती पाठक यांनी केले. ए.एस. मुळे यांनी आभार मानले.
फोटो २२ शिबिर
ओळी- जिल्हा न्यायालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे.