लिंबाच्या भावात वाढ, मात्र कांदा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:09+5:302020-12-30T04:28:09+5:30
लिंबाचे भाव मागील महिन्यात १० रुपये किलोपेक्षा कमी होते; पण उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाचे भाव वाढू लागले आहेत. लिंबू ...
लिंबाचे भाव मागील महिन्यात १० रुपये किलोपेक्षा कमी होते; पण उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाचे भाव वाढू लागले आहेत. लिंबू २५ रुपये किलो दराने विकले जाऊ लागले. मात्र, लिंबाच्या उत्पादनात मोठी घट होऊ लागली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात लिंबू भावात शतकी आकडा पार करण्याची शक्यता नाकारता आहे.
नवीन गुलाबी कांद्याची आवक सुरू होताच जुन्या कांद्याचा भाव कवडीमोल झाला आहे. नवीन कांद्याला २० रुपये भाव मिळत आहे. पुढील महिन्यात कांद्याचे भाव अस्थिर होण्याची भीती आहे.
....
लिलाव होत नाही
लिंबाच्या लिलाव पद्धतीने बराच दगारोळ झाला होता; पण श्रीगोंदा बाजार समिती व पारगाव फाट्यावरील चैतन्य बाजार समिती वगळता इतर कुठेही लिंबाचे लिलाव होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लिंबाला तीन ते चार रुपये किलोमागे कमी भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे.