संगमनेर तालुक्यात शेतक-यावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:22 PM2018-04-11T12:22:29+5:302018-04-11T12:25:50+5:30
संगमनेर तालुक्यातील चिंचपूर दुर्गापूर येथील एका शेतक-यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सुनिल सखाराम गवारे जखमी झाले आहे. बिबट्यानं सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
आश्वी - संगमनेर तालुक्यातील चिंचपूर दुर्गापूर येथील एका शेतक-यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सुनिल सखाराम गवारे जखमी झाले आहे. बिबट्यानं सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.
बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता बिबट्यानं पळत येऊन हल्ला केला. यावेळी त्यांनी बिबट्याशी झुंज देत आरडाओरड केली. या आरडाओरडीनं सचिन राधाकिसन गवारे, अनिल राधाकिसन गवारे, सखाराम बबन गवारे, बिजला गवारे, मथुरा गवारे, संगिता गवारे हे मदतीसाठी धावून गेले. त्यानंतर बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात सुनिल गवारे जखमी झाले. यापुर्वी गेल्या दहा दिवसांत बिबट्यानं अनिल मनकर, गबाजी मनकर, बाळासाहेब कुलाटे, अस्तगाव येथील एका जणांवर हल्ला केला आहे. वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.