देवगावात बिबट्या जेरबंद
By Admin | Published: May 14, 2016 11:46 PM2016-05-14T23:46:37+5:302016-05-14T23:50:50+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा- देवगाव मार्गावरील आगळे वस्ती परिसरात धुमाकूळ घालणारा ५ वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात जेरबंद झाला.
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा- देवगाव मार्गावरील आगळे वस्ती परिसरात धुमाकूळ घालणारा ५ वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात जेरबंद झाला.
भेंडा परिसरात गेल्या महिन्यात बिबट्याची मादी रानडुकरांच्या हल्ल्यात ठार झाली होती. त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याची धास्ती घेतली होती. भेंडा येथून देवगावला रात्री जाताना दुचाकीच्या उजेडात बिबट्याला पाहिल्याचे अशोक जामदार, राजू कोलते यांनी सांगितले.
नागरिकांच्या मागणीनुसार रावसाहेब आगळे यांच्या केळीच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंजऱ्यात सावज म्हणून ठेवलेली शेळी मात्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. बिबट्याला निसर्गात मुक्त करण्यासाठी माणिकडोह, ता. जुन्नर येथील बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती नेवाशाचे वन परिमंडल अधिकारी साहेबराव ढेरे यांनी दिली. बिबट्याला वन कर्मचारी प्रमोद मोरे, सयाजी कदम यांनी सुरक्षितस्थळी हलविले.
(वार्ताहर )