संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी परिसरात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 08:07 PM2019-02-27T20:07:14+5:302019-02-27T20:08:06+5:30
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शेळकेवाडी ते अकलापूर रस्त्यावरील एका मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शेळकेवाडी ते अकलापूर रस्त्यावरील एका मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
घारगाव परिसरातील शेळकेवाडी शिवारातील शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लक्ष्मीबाई शिवनाथ आहेर यांच्या मालकीच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार केली होती. तसेच दोन शेतकरी मोटार चालू करायला गेले असताना दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्यावर गुरगुरला होता. परिसरातील घारगाव शिवसेना शाखा प्रमुख संभाजी धात्रक, गोरक्ष पिसाळ यांसह शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. बुधवारी बिबट्या पिंजºयात अडकला आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून सुमारे सहा वर्षे वयाचा आहे. शेळकेवाडी शिवारात चार पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याला चंदनापुरी येथील निसर्गपरिचय केंद्रात नेण्यात येणार असल्याचे वनपाल रमेश पवार यांनी सांगितले.
परिसरात अजूनही बिबटे असल्याने उपसरपंच राजेंद्र कान्होरे नारायण आहेर, प्रशांत कान्होरे, अशोक पाडेकर, नवनाथ खोंड, कैलास आहेर, योगेश कान्होरे, संजय वाघ, गंगाधर घुले, विकास मते आदींनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.