जेऊरमध्ये बिबट्याची दहशत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:03+5:302021-09-03T04:22:03+5:30
मागील आठवड्यात खंडोबा माळ परिसरात भिवा घुले यांच्या ३ मेंढ्या व कुत्र्याची बिबट्याकडून शिकार करण्यात आली होती. त्यानंतर शेटे ...
मागील आठवड्यात खंडोबा माळ परिसरात भिवा घुले यांच्या ३ मेंढ्या व कुत्र्याची बिबट्याकडून शिकार करण्यात आली होती. त्यानंतर शेटे वस्ती येथील नरेंद्र तोडमल यांच्या कुत्र्याची शिकारही बिबट्याने केली. भिवा घुले यांनी दोन बिबटे प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती वनविभागाला दिली आहे. चापेवाडी येथील मेर परिसरात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु बाळासाहेब देशमुख, भरत पवार, शिवाजी तोडमल, जालिंदर पवार, संपत वने या गुराख्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याने तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे व तुकाराम तवले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या वतीने परिसरात वनक्षेत्रपाल सुनील थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक श्रीराम जगताप, वनरक्षक मनेष जाधव, वनकर्मचारी संजय सरोदे, तुकाराम तवले, संजय पालवे, मुकेश साळवे, बालकृष्ण पालवे हे गस्त घालत आहेत.