येवती गावात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:22+5:302021-02-18T04:37:22+5:30

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास ...

Leopard terror in Yevati village | येवती गावात बिबट्याची दहशत

येवती गावात बिबट्याची दहशत

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास गिरीश चोरमले यांच्या घराजवळील शेळ्या-कोंबड्यांसाठी असलेल्या जाळीत बिबट्याची तीन पिल्ले शिरली होती. तीन बाजूंनी जाळी तर एका बाजूने साधी हिरवी नेट लावली. त्या साध्या नेटच्या बाजूने बिबट्याची तीन पिल्ले आत शिरली. जाळीतील शेळ्या, कोंबड्यांनी आवाज केला. त्यामुळे बिबट्याच्या पिल्लांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जाळीबाहेर पडता येईना. अखेर ती कशीबशी बाहेर पडली. त्यानंतर पहाटे ५.३० तीन बिबट्याची पिल्ले पुन्हा जाळीकडे आली. त्यावेळीही ते अर्धा तास तेथेच होती. चोरमले यांनी बॅटरी व काठीच्या साह्याने त्यांना हुसकावून लावले. सध्या परिसरात ऊस तोडणी झाल्यानंतर बिबट्याची दहशत कमी झाली आहे. त्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविला आहे.

----

येवती परिसरात बिबट्याची पिल्ले आढळलेल्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल. नागरिकांनीही काळजी घ्यावी. रात्री एकटे फिरू नये. रात्री शेतात पाणी देताना हातात बॅटरी व काठी असावी.

- मच्छिंद्र गुंजाळ,

वनपाल, श्रीगोंदा

Web Title: Leopard terror in Yevati village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.