पाबळ शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:21 AM2020-06-12T11:21:36+5:302020-06-12T11:22:06+5:30
पारनेर तालुक्यातील पाबळ शिवारात गेल्या आठवडाभरापासून उसाच्या शेतात लपलेल्या एका नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान वनखात्याने लावलेल्या पिंज-यात शुक्रवारी पहाटे (दि.१२ जून) हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
अळकुटी : पारनेर तालुक्यातील पाबळ शिवारात गेल्या आठवडाभरापासून उसाच्या शेतात लपलेल्या एका नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान वनखात्याने लावलेल्या पिंज-यात शुक्रवारी पहाटे (दि.१२ जून) हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
सध्या पेरणीचा मोसम असल्याने शेतीकामाची घाई सुरू आहे. बिबट्याने गेल्या आठवड्यापासून पाबळ शिवारात कुत्रे, शेळ्या फस्त करुन धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतीच्या कामासाठी कोणी धजावत नव्हते.
याबाबत ग्रामस्थांनी ८ जूनला आमदार निलेश लंके यांना माहिती दिली होती. लंके यांनी तातडीने वनविभागाला पिंजरा लावण्याचे आदेश दिले होते. दि.९ जूनला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला होता.
अखेर या पिंज-यात शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. पिंजºयात अडकलेला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.