लोकमत मुलाखत:राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे, गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:27 PM2020-08-25T12:27:54+5:302020-08-25T12:29:58+5:30

अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

Lessons from President's Award winner Mangalaram, Laying the foundation of self-reliant education in Gopalwadi School | लोकमत मुलाखत:राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे, गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी

लोकमत मुलाखत:राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे, गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी

चंद्रकांत शेळके


अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.


मराठी, इतिहास, इंग्रजी या तीन विषयांची पदव्युत्तर पदवी घेतलेले शिक्षक मंगलारम सध्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत तिसरी, चौथीचे वर्गशिक्षक आहेत. मूळचे अहमदनगर येथील असलेले मंगलारम यांनी डी. एड. केल्यानंतर २००३पासून शिक्षकी पेशाला सुरूवात केली. प्रारंभीची १४ वर्षे त्यांनी पैठण तालुक्यात विविध शाळांवर सेवा दिली. २०१७ मध्ये आंतरजिल्हा बदलीने ते राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेत आले. शिक्षकी पेशाच्या सुरूवातीपासून मंगलारम यांनी हसतखेळत आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला. मुलांना पुस्तकातून शिकवण्यापेक्षा कृतीतून, दृकश्राव्य पद्धतीने शिकवले तर विद्यार्थी ते कैक पटीने ग्रहण करतात, हे मानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण हीच पद्धत वापरतो, असे ते सांगतात. त्यांना कलेची आवड असल्याने नाटक, एकांकिका, गायन, खेळ, कविता वाचून ते मुलांना जिंकून घेतात. त्यांच्या इतिहासाच्या तासाची तर विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहतात. कारण इतिहास शिकवताना ते प्रत्येक विद्यार्थ्याला एकेका पात्रात बसवून त्यांच्याकडून संवाद बोलून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासासह अभिनयाचाही एक तास होतो.

नेमके हेच मुलांना भावते. लोकशाहीतील निवडणूक पद्धत विद्यार्थ्यांना अनुभवता यावी म्हणून ते वर्गातच दोन गटात निवडणूक घेतात. मग दोन गट, त्यांचे चिन्ह, प्रचार, प्रत्यक्ष बटन दाबून मतदान, नंतर मतमोजणी व निकाल. हीच त्यांची अध्ययनपद्धती आहे. मुलांच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्या कौशल्याला ते नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाची जोड देतात. आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी खेड्यापाड्यातील या मुलांना शाळेत बसून जगाची सफर घडवली आहे. स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली. दक्षिण कोरियामधील शाळेने गोपाळवाडीच्या मुलांसाठी कल्चरल बॉक्स पाठवला आहे.

ग्लोबल नगरीच्या माध्यमातून मुलांनी महाराष्ट्रातील परंतु सध्या जगभर कामानिमित्त असणाऱ्या आपल्या भूमिपुत्रांशी गप्पा मारल्या. यातून विद्यार्थ्यांना संवादकौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धतीची ओळख झाली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यंदा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांनी मोहोर उमटवली असून येत्या शिक्षकदिनी दिल्लीत राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान होणार आहे.

सहभाग आणि कार्य
४कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात (एटीएम) महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक.
४महाराष्ट्राच्या चार राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग - नियमित रक्तदाता , गेल्या २० वर्षात ७० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले.

-----------
निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव.
 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.
एनसीईआरटीच्या ( दिल्ली) कला विभागात मास्टर ट्रेनर म्हणून निवड.
एनसीईआरटीकडून मॉडेल स्कूल म्हणून गोपाळवाडी शाळेची निवड आणि - फेब्रुवारी २०१९ मध्ये एनसीईआरटी कला पथकाची शाळेला भेट.

Web Title: Lessons from President's Award winner Mangalaram, Laying the foundation of self-reliant education in Gopalwadi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.