दर्जेदार कामांतून नेवासा शहराचा चेहरामोहरा बदलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:36+5:302021-02-09T04:24:36+5:30
नेवासा : आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दर्जेदार कामांतून नेवासा शहराचा चेहरामाेहरा बदलू, असे प्रतिपादन पंचायत समिती ...
नेवासा : आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दर्जेदार कामांतून नेवासा शहराचा चेहरामाेहरा बदलू, असे प्रतिपादन पंचायत समिती माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले.
नगरपंचायत अंतर्गत नेवासा शहरातील मंजूर झालेल्या ३ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते नुकतेच झाले.
मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटारी अशा विविध विकास कामांसाठी निधी मिळाला आहे.
यावेळी नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, सतीश पिंपळे, नगरसेविका अंबिका इरले, अंबादास ईरले, अर्चना कुऱ्हे, जितेंद्र कुऱ्हे, फिरोजबी पठाण, नगरसेवक फारूक आतार, संदीप बेहळे, सचिन वडागळे, ‘मुळा’चे संचालक नारायण लोखंडे, दिलीप जामदार, पोपट जिरे, अनिल ताके, अंबादास लष्करे, सचिन कदम, सुलेमान मणियार आदी उपस्थित होते.
गडाख म्हणाल्या, नेवासाकरांनीही सहकार्याची भूमिका घेऊन चांगल्या कामाच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. कामे दर्जेदार होतील यासाठी रहिवाशांनीही लक्ष घालावे. आम्हाला सूचना कराव्यात. ठेकेदारांनीही कामात तडजोड न करता ते दर्जेदार कसे होतील यासाठी प्रयत्न करावा.
सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पिंपळे यांनी आभार मानले.
फोटो : ०८ नेवासा