भाविकांच्या मदतीतून कोविडच्या अडचणी दूर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:13+5:302021-04-16T04:21:13+5:30
शिर्डी: भाविकांच्या मदतीने येत्या आठवडाभरात कोविड संदर्भातील महत्त्वाच्या सगळ्या अडचणी दूर करू, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
शिर्डी: भाविकांच्या मदतीने येत्या आठवडाभरात कोविड संदर्भातील महत्त्वाच्या सगळ्या अडचणी दूर करू, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
बगाटे आयएएस प्रशिक्षणासाठी सध्या मसुरीत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे कामकाज बघत आहेत.
सध्या कोविडची परिस्थिती खूपच बिघडल्याने बगाटे यांनी मसुरीवरून सुत्रे हलविण्यास सुरुवात केली आहे.
येत्या चार दिवसात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल. रेमडेसिविर इंजेक्शनसुद्धा संस्थानला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. यासाठी संबंधित कंपनीच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा झाल्याचे बगाटे यांनी सांगितले.
कोविडची आरटीपीसीआर चाचणी अहवाल लवकर येत नसल्याने उपचारात अडचणी येत आहेत. शिवाय अहवाल येईपर्यंत अनेक नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने कोविडचा फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतच कोविड टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले.
संस्थानला प्रत्येक वस्तू खरेदीसाठी परवानगी व टेंडर प्रक्रिया राबवण्याची गरज असते. हे सगळं वेळखाऊ असल्याने व त्यात बराच कालावधी जाणार असल्याने तातडीचा, खात्रीचा व प्रभावी मार्ग म्हणून भाविकांना साद घालण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले.