ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:25 AM2021-02-17T04:25:47+5:302021-02-17T04:25:47+5:30
निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात मंगळवारी ग्रंथालय व माहितीशास्त्र केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ...
निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात मंगळवारी ग्रंथालय व माहितीशास्त्र केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी.खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, ग्रंथपाल प्रा.एस. एस. तुवर उपस्थित होते.
झावरे पुढे म्हणाले, पुस्तके खरा गुरू, मित्र व मार्गदर्शक आहेत. उज्ज्वल भवितव्यासाठी अभ्यासाचे धोरण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ओढा वाचनालयांकडे सध्या वाढत आहे. ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे निघोज महाविद्यालयांतील सर्व विद्यार्थ्यांना या ग्रंथालयाचा चांगला उपयोग होईल.
या निमित्ताने महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाने रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी प्रा. डॉ. पोपट पठारे, सचिन निघुट, मनीषा गाडीलकर, विशाल रोकडे, गोविंद देशमुख, प्रविण जाधव, शामराव रोकडे, अशोक कवडे, रामदास खोडदे, अक्षय अडसूळ, प्रीती कार्ले, आनंद पाटेकर, अंजली मेहर, दिपाली जगदाळे, पोपट सुंबरे, प्रतिभा शेळके, स्वाती मोरे, प्रा.संगीता माडगे, नीलिमा घुले, सतीश काकडे, नवनाथ घोगरे, संदीप लंके आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.