चुुलत्याचा खून करणा-यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:19 AM2019-04-17T11:19:25+5:302019-04-17T11:20:01+5:30
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़ विलास देवराम नरसाळे (वय ४८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़
जिल्हा न्यायाधीश एस़आऱ जगताप यांनी बुधवारी हा निकाल दिला़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ अनिल दि़ सरोदे यांनी काम पाहिले़ आरोपी विलास नरसाळे याने १३ आॅगस्ट २०१५ रोजी त्याचे चुलते चिमाभाऊ बळवंत नरसाळे यांना शेतीच्या वादातून कुºहाडीच्या दांड्याने मारहाण केली होती़
या घटनेनंतर चिमाभाऊ नरसाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता़ याप्रकरणी मयताचा नातू संपत अंबादास नरसाळे याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ या घटनेचा तत्कालीन पोलीस निरीक्षक डि़बी़ पारेकर यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या खटल्यात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले़ यात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता़ समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेप, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली़ सरोदे यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल बी़बी़ बांदल यांनी सहकार्य केले़