संपदा पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच जणांना जन्मठेप
By अण्णा नवथर | Published: April 10, 2024 12:30 PM2024-04-10T12:30:44+5:302024-04-10T12:34:45+5:30
Ahmednagar: संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप त्याची शिक्षा सुनावली.
- अण्णा नवथर
अहमदनगर - संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप त्याची शिक्षा सुनावली. तसेच इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
येथील नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने याप्रकरणी सर्व आरोपींना दोषी धरून त्यांच्या शिक्षेबाबतही युक्तिवाद झालेला होता. त्यावर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला असून, अध्यक्ष ज्ञानदेव वादरे व त्याची पत्नी सुजाता वाफरे साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे , अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वसंत ढगे यांनी बाजू मांडली. ठेविदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी तर अवसायिकाच्या वतीने ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी