जीवन अनमोल आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:06+5:302021-02-13T04:20:06+5:30
युवा व क्रीडा मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (नवी दिल्ली) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी निर्देशित केल्यानुसार ...
युवा व क्रीडा मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (नवी दिल्ली) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी निर्देशित केल्यानुसार १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा माह राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात शुक्रवारी (दि. १२) राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल नरेन दास प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना कक्षाचे समन्वयक डॉ. नरेंद्र फटांगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम आदी उपस्थित होते.
सरकार वेळोवेळी वाहतूक नियमांचे वेगवेगळे कायदे, नियम करत असते. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. सुरक्षित प्रवास करा, सुरक्षित पोहचा, सुरक्षित रहा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संदीप देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ललिता मालसुरे यांनी केले. डॉ. फटांगरे यांनी आभार मानले.