कत्तलीसाठी चालविलेल्या १२ गोवंश जनावरांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 12:48 PM2021-02-05T12:48:03+5:302021-02-05T12:48:28+5:30

टेम्पोत निर्दयतेने गोवंश जनावरे भरून कत्तलीसाठी ही जनावरे घेऊन जाणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पथकाने पाठलाग करून पकडले. ही घटना बुधवारी (दि. ३) संगमनेर-लोणी रस्त्यावर समनापूर गावच्या शिवारात घडली.

Life saving to 12 cows, | कत्तलीसाठी चालविलेल्या १२ गोवंश जनावरांना जीवदान

कत्तलीसाठी चालविलेल्या १२ गोवंश जनावरांना जीवदान

संगमनेर : आयशर टेम्पोत निर्दयतेने गोवंश जनावरे भरून कत्तलीसाठी ही जनावरे घेऊन जाणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पथकाने पाठलाग करून पकडले. ही घटना बुधवारी (दि. ३) संगमनेर-लोणी रस्त्यावर समनापूर गावच्या शिवारात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १२ गोवंशांना पोलिसांनी जीवदान दिले.

 टेम्पो चालक मोहमंदएजाज इसाक सौदागर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पोलीस कॉस्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन लाख रूपये किंमतीची १२ गोवंश जनावरे व ६ लाख ५० हजार रूपयांचा आयशर टेम्पो (एम. एच. १४, बी. जे. २००५) असा एकुण ९ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय पवार तपास करीत आहेत. गोवंश जनावरे गोशाळेत पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Life saving to 12 cows,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.