लाच घेणाऱ्या लाईनमला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:34+5:302021-02-09T04:23:34+5:30
नवनाथ नामदेव निर्मल (वय ४३ रा. लोणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो लोणी येथील कार्यालयात कार्यरत आहे. ...
नवनाथ नामदेव निर्मल (वय ४३ रा. लोणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो लोणी येथील कार्यालयात कार्यरत आहे. यातील तक्रारदार याने त्याच्या आडगाव खुर्द येथील राहत्या घरात विद्युत जोडणी घेण्यासाठी कोटेशन भरले होते. वीजजोड व मिटर लावकर बसून देण्यासाठी निर्मल याने साडेचार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. सोमवारी निर्मल याला लोणी येथील एका हाॅटेलमध्ये तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपये घेतना पथकाने पंचासमक्षक अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शाम पवरे, हेड कॉस्टेबल तन्वीर शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, चौधरी, विजय गंगुल, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, राधा खेमनर, संध्या म्हस्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.