पालिकेच्या साठवण तलावाचे अस्तरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:20 AM2021-04-01T04:20:51+5:302021-04-01T04:20:51+5:30

काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोद संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष ...

Lining of municipal storage pond | पालिकेच्या साठवण तलावाचे अस्तरीकरण

पालिकेच्या साठवण तलावाचे अस्तरीकरण

काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोद संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, मनोज लबडे, भारती परदेसी, मीरा रोटे, आशा रासकर यांनी आमदार कानडे यांना त्यासाठी धन्यवाद दिले आहेत.

दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या कार्यकाळात तलावाचे खोलीकरण व काँक्रिटीकरण झाले होते. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढली होती. पाण्याच्या बाबतीत शहर स्वयंपूर्ण झाले; परंतु पाण्याची गळती होऊ नये यासाठी तलावाचे अस्तरीकरण करण्याचा संकल्प ससाणे यांनी केला होता. त्यांच्याच विकासाचे धोरण स्वीकारून आमदार लहू कानडे यांनी मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या अस्तरीकरणासाठी मंत्री पाटील यांच्याकडे आग्रही मागणी केली, असे ससाणे यांनी सांगितले.

आमदार कानडे यांच्या प्रयत्नामुळे लवकरच निधी उपलब्ध होऊन तलावाचे काम मार्गी लागणार आहे. भविष्यात वाढणारे शहरीकरण व लोकसंख्या विचारात घेता, कानडे यांनी साठवण तलावाची क्षमता वाढविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ससाणे यांच्या पावलावर पाऊल टाकत कानडे यांनी विकासाचे धोरण अवलंबिले आहे, असे ससाणे म्हणाले.

--------

Web Title: Lining of municipal storage pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.