संगमनेरात प्रतिबंधित भागात उघडली दारूची दुकाने; प्रशासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 02:54 PM2020-05-05T14:54:42+5:302020-05-05T14:55:21+5:30

लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात संगमनेर शहरातील कोल्हार-घोटी राज्य महामार्ग, कॉलेज रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, सय्यद बाबा चौक या प्रतिबंधित केलेल्या भागात केवळ जीवनावश्यक  वस्तुंची दुकाने उघडी राहतील, असे प्रशासनाचे आदेश होते. परंतु याच भागात दारूची दुकाने मंगळवारी उघडण्यात आली होती. 

Liquor shops opened in restricted areas in Sangamnera; Asthma of the administration | संगमनेरात प्रतिबंधित भागात उघडली दारूची दुकाने; प्रशासनाची दमछाक

संगमनेरात प्रतिबंधित भागात उघडली दारूची दुकाने; प्रशासनाची दमछाक

संगमनेर : लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात संगमनेर शहरातील कोल्हार-घोटी राज्य महामार्ग, कॉलेज रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, सय्यद बाबा चौक या प्रतिबंधित केलेल्या भागात केवळ जीवनावश्यक  वस्तुंची दुकाने उघडी राहतील, असे प्रशासनाचे आदेश होते. परंतु याच भागात दारूची दुकाने मंगळवारी उघडण्यात आली होती. 
 लॉकडाऊन संचारबंदी असताना देखील दारूची दुकाने उघडल्याने फिजीकल डिस्टन्सिगचे सर्वच नियम पायदळी तुडवित दारू खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. दारूच्या दुकानांसमोरील रांगामुळे प्रशासन, पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. यानंतर मात्र प्रतिबंधित क्षेत्रात असलेली दारू दुकाने प्रशासनाने दुपारी एक वाजेच्या सुमारास बंद केली आहेत. 

Web Title: Liquor shops opened in restricted areas in Sangamnera; Asthma of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.