झाडे जगवा, बक्षीस मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:19+5:302021-06-25T04:16:19+5:30
नवनागापूर : नवनागापूर गावातील ओपन स्पेस, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच वेगवेगळ्या कॉलनींमध्ये वृक्षलागवड चळवळ सरपंच डॉ. बबनराव डाेंगरे यांच्या पुढाकारातून ...
नवनागापूर : नवनागापूर गावातील ओपन स्पेस, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच वेगवेगळ्या कॉलनींमध्ये वृक्षलागवड चळवळ सरपंच डॉ. बबनराव डाेंगरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. गुरुवारी वटपौर्णिमेचे औचित्य साधून सुमारे २०० झाडांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे जगविणाऱ्यांसाठी होगानस कंपनीकडून बक्षीस योजना जाहीर करण्यात आली.
नवनागापूर येथील मोहनीनगर व अर्थव कॉलनी येथे नवजीवन प्रतिष्ठान, होगानस इंडिया कंपनी यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्यात आली. होगानस कंपनीने २०० झाडे व १०० ट्री गार्ड ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवड चळवळीसाठी दिले. सरपंच डॉ. डोंगरे यांच्या हस्ते वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर सप्रे, दीपक गीते, गोरख गव्हाणे, मंगल गोरे, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ, ग्रामस्थ धनराज सप्रे, संजय चव्हाण, संजय खाडे, किशोर खाडे, बापू साळवे, विकास लोखंडे, सुभाष मस्के, श्रीकांत पवार, रेणुका पुंड, सोनाली चवरे, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, होगानस कंपनीचे एचआर मॅनेजर सुभाष तोडकर, सचिन हुलावळे, अनिल साबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
होगानस कंपनीने पुढील १ वर्षात जो ग्रामपंचायत कर्मचारी चांगली झाडे जगविल, त्याला प्रथम बक्षीस ५ हजार, द्वितीय बक्षीस ३ हजार आणि तृतीय बक्षीस २ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.
लावलेली झाडे जगविण्यासाठी नवनागापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गावातील ऑपनस्पेस वाटून दिले जाणार आहे. जो कर्मचारी १ वर्षात चांगली झाडे जगवतील, त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी होगानस कंपनीने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती सदस्य सागर सप्रे यांनी दिली.
...........
२४ नवनागापूर ट्री
नवनागापूर येथील मोहनीनगर व अर्थव कॉलनी येथे वृक्षारोपण करताना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्यासह सदस्य सागर सप्रे, दीपक गीते, नवजीवनचे राजेंद्र पवार, होगानस कंपनीचे सुभाष तोडकर, सचिन हुलावळे आदी.