साईनगरीसह राहाता तालुका वीक एन्डला हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:36+5:302021-04-05T04:19:36+5:30
शनिवार, रविवार दोन दिवसांत राहाता तालुक्यात ३८५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. शनिवारी तालुक्यात १९५, तर ...
शनिवार, रविवार दोन दिवसांत राहाता तालुक्यात ३८५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. शनिवारी तालुक्यात १९५, तर रविवारी १९० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
रविवारी आलेल्या अहवालात शिर्डीत ३८, राहाता ३६, लोणी २७, कोल्हार ९, प्रवरानगर ५, वाकडी ८, सावळीविहीर ५, साकुरी ५, रांजणगाव ४, निर्मळ पिंप्री ४, गणेशनगर ३, केलवड ३, बाळेश्वर ३, राजुरी ३, पुणतांबा ३, पाथरे ३ या गावांसह रामपूरवाडी, पिंपळस, निमगांव, निघोज, नांदुर्खी बु, लोहगांव, कोऱ्हाळे, कनकुरी, एकुरखे, दहेगांव चंद्रापूर व दाढ या गावांतही रुग्ण सापडले आहेत.
रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली असून इतक्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी साई संस्थानसह तहसीलदार व आरोग्य विभाग मोठी मेहनत घेत आहे. त्याचबरोबर खासगी कोविड सेंटरलाही परवानगी दिली जात आहे.
...........
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शिर्डीतील कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी शिर्डीत ऑक्सिजन बेडची कमतरता असून रुग्ण वेटिंगवर आहेत. शिर्डीत केवळ तीन व्हेंटिलेटर आहेत, स्टाफची कमतरता आहे़ याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, याबाबत माहिती घेऊन पंतप्रधान योजनेतून व्हेंटिलेटर वाढवण्यात येतील, कमी दरात रेमडेसीविर उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करू, संस्थानशी चर्चा करून सेंटरची क्षमता व सुविधा वाढवण्याची ग्वाही जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली.