स्थानिक माणूसच प्रश्न सोडवेल-भानुदास मुरकुटे; कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:53 PM2019-10-16T16:53:12+5:302019-10-16T16:54:13+5:30

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

The local man will solve the problem - Bhanudas wrinkles; Meeting for the promotion of Kamble | स्थानिक माणूसच प्रश्न सोडवेल-भानुदास मुरकुटे; कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा

स्थानिक माणूसच प्रश्न सोडवेल-भानुदास मुरकुटे; कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा

श्रीरामपूर : समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
मतदारसंघातील चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, करजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खुर्द, पढेगाव, निपाणीवडगाव येथील  प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते. हिम्मत धुमाळ, काशिनाथ गोराणे, अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब हळनोर, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, भाजपचे बबन मुठे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. हक्काचे पाणी गेले. शेती उजाड तर शेतकरी उदध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ  शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाºया शेतमजूर व गोरगरिबांचा रोजगार गेला. आज अशोक उद्योग समूह एवढे एकच विकासाचे व अर्थकारणाचे केंद्र उरले आहे. पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडले.  या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास विजयी करा.
भाऊसाहेब कांबळे म्हणाले, निवडणुकीच्यावेळी अवतरणा-यांनी तालुक्याची उठाठेव करु नये. आम्ही येथेच जन्मलो आणि वाढलो असून येथील प्रश्न आम्हाला माहिती आहेत. हिम्मत धुमाळ म्हणाले, निवडणुकांमध्ये तोंड दाखविणा-या नेत्यांना जनता घरी बसवणार आहे. भाऊसाहेब कांबळे हे हॅट्रिक साधणार आहेत. रावसाहेब थोरात, सोपान राऊत, भाऊसाहेब उंडे, नितीन बनकर, आबासाहेब थोरात, रामुआण्णा थोरात, सुनील थोरात, अनिल थोरात, अशोक थोरात उपस्थित होते.

Web Title: The local man will solve the problem - Bhanudas wrinkles; Meeting for the promotion of Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.