पुन्हा लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, प्रशासनाच्या निर्णयाकडे नगरकरांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:00 AM2020-07-14T11:00:16+5:302020-07-14T11:00:54+5:30
‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात नगरमध्ये आता पुन्हा लॉकडाऊनची गरज, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़. शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका प्रशासन आले आहे़. यासंदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवकांशी प्राथमिक चर्चा केली़.
अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे़ कोरोनावर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन एकजुटीने आजपासून मैदानात उतरले आहे. कोरोनाची महाभयंकर साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, यावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये प्रथमच चर्चा झाली़ शहरातील सर्व घटकांचा विचार करूनच पुढील निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले़.
‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात नगरमध्ये आता पुन्हा लॉकडाऊनची गरज, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़. शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका प्रशासन आले आहे़. यासंदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्यासह नगरसेवकांशी प्राथमिक चर्चा केली़.
यावेळी शहरातील परिस्थिती हाताळण्याबाबत सविस्तर चर्चा झाली़ आयुक्त मायकलवार यांनी शहरातील वाढत्या आकडेवारीची माहिती देऊन उपलब्ध वैद्यकीय सुविधांकडे लक्ष वेधले़. नागरिकांच्या बेफिकिरीबाबत प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली़. त्यामुळे संसर्ग झपाट्याने होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़. दररोज एक परिसर झोन म्हणून जाहीर करावा लागत आहे़. त्यामुळे निम्मे शहर कंटेनमेंट झोनमध्ये आहे़. उर्वरित भागातही दररोज रुग्णांचे निदान होत आहे़ ही परिस्थिती अशीच राहिल्यास कठीण प्रसंगाला नगरकरांना सामोरे जावे लागेल़. त्यामुळे वेळीच निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी सांगितले़. यावर झालेल्या चर्चेतून जनता कर्फ्यू या दुसºया पर्यायावरही चर्चा झाली़.
जनता कर्फ्यू लागू केल्यास नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळणे गरजेचे आहे़ कर्फ्यूत अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, याचाही विचार करावा लागेल़. लॉकडाऊन करायचा झाल्यास तो किती दिवस करावा, या काळात हातावर पोट असणाºयांचे काय, त्यांची होणारी उपासमार कशी टाळता येईल, यावर लोकप्रतिनिधींनी मते व्यक्त केली़. रुग्ण वाढल्यास काही मोठ्या इमारती ताब्यात घेऊन तिथे रुग्णांची व्यवस्था करण्याचे ठरले़. त्यासाठी इमारती उपलब्ध करण्यासाठी आमदार जगताप इमारत मालकांशी चर्चा करणार आहेत़.
आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणू - जगताप
नगर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये़. पुढील आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणू, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला़. अधिकाºयांच्या बैठका घेऊन सूचना करण्यात आलेल्या आहेत़. त्यानुसार कामाला सुरुवात झालेली आहे़ कोविड चाचणी केंद्रही महापालिकेमार्फ त सुरू करण्यात आले आहे़.
पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे़. अचानक रुग्णांची संख्या वाढल्यास त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. आयुर्वेद महाविद्यालयही रुग्णांसाठी खुले करण्यात येणार आहे़ तिथे ५० हून अधिक रुग्णांची व्यवस्था होईल़. ही इमारतही कमी पडल्यास लेबर फेडरेशनची नवी व सुसज्ज इमारतही ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे़. तिथे काटेकोर नियोजन करून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील़. कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही जगताप यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वाढती रुग्ण संख्या पाहता काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केली़ या चर्चेदरम्यान लॉकडाऊन न करता जनता कर्फ्यू पाळण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली़ यापैकी कोणता निर्णय घ्यायचा ते लोकप्रतिनिधी व महापालिकेतील प्रमुख अधिकारी आणि वरिष्ठांशी चर्चा करूनच ठरविले जाईल़
- श्रीकांत मायकलवार, आयुक्त