अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन, जिल्हाधिकारी यांचा आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 03:42 PM2020-06-30T15:42:25+5:302020-06-30T15:44:09+5:30

अहमदनगर- महाराष्ट्र सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.

Lockdown in Ahmednagar district till July 31 | अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन, जिल्हाधिकारी यांचा आदेश लागू

अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन, जिल्हाधिकारी यांचा आदेश लागू

अहमदनगर- महाराष्ट्र सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.

राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन होता. त्यानुसार पूर्वीच्या आदेशाची मुदत आज संपली. त्यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार आहेत.

नवीन आदेशात काही नियमांचे पालन करून सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहणार आहेत. पूर्वीप्रमाणेच जिल्हाबंदी, तसेच हॉटेल, रेस्टारंट सुरू करण्यास मनाई असेल.

दुकानांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे अनिवार्य असेल. याशिवाय मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आदी नियम न पाळण्यास कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालयेही ३१ जुलैपर्यंत बंदच असणार आहेत. 
 
Web Title: Lockdown in Ahmednagar district till July 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.