नेवासा शहरातील हॉटस्पॉटमधील लॉकडाऊन वाढविला, नऊ दिवस शहर बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:13 PM2020-04-18T14:13:09+5:302020-04-18T14:13:36+5:30
नेवासा : नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून १३ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटस्पॉट मधील लॉकडावून १९ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले . या दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा ही २७ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

नेवासा शहरात १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर प्रशासनाने नेवासा शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा लोकडवून २७ एप्रिल पर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील सर्व दवाखाने,सर्व बँका,किराणा दुकाने,मेडिकल दुकाने तसेच भाजीपाला विकणारे यांनाही दुकाने बंद राहणार आहे.
दरम्यान रस्त्यावर कुणीही फिरू नये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वेळ प्रसंगी वाहने ही जप्त करण्यात येतील. शहरातील किराणा, मेडिकल,दूध,भाजीपाला या सर्व वस्तू नेमून दिलेल्या दुकानदारांना मोबाईलवर फोन केल्यानंतर घरपोहोच मिळतील. नेवासा शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी ‘आम्ही नेवासकर’ अँप चा वापर करावा असे आवाहन तहसीलदार रुपेश सुराणा यांनी केले.