संगमनेर तालुक्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:55 AM2020-04-20T10:55:13+5:302020-04-20T10:55:28+5:30

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित चार रूग्णांची दुसºयांदा तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व रूग्ण एकाच वेळी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले की, ३ मे पर्यंत संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन राहणार आहे. सर्वांनी या नियमांचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

Lockdown will be held in Sangamner taluka till May 7 | संगमनेर तालुक्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार       

संगमनेर तालुक्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार       

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित चार रूग्णांची दुसºयांदा तपासणी केली असता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्व रूग्ण एकाच वेळी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले की, ३ मे पर्यंत संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन राहणार आहे. सर्वांनी या नियमांचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
    प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे म्हणाले, संगमनेर तालुक्यात लॉकडाऊनची स्थिती पुर्वीप्रमाणेच ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. नागरिकांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असेच येथून पुढेही ते गरजेचे आहे. आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, शैक्षणिक संस्था, खासगी कोचिंग क्लासेस, औद्योगिक आस्थापना, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, स्विमींग पुल, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सांस्कृतिक, मनोरंजनाचे व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पुजा-पाठ करण्यास मनाई आहे. अंत्यविधी देखील जास्तीत जास्त वीस व्यक्तींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा.
    अत्यावश्यक सेवा जसे रूग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथालॉजीकल लॅबोरेटरी, जनावरांचे दवाखाने त्यांची औषधी दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, खते, बी-बियाणे, किटकनाशके, औषधी दुकाने, किराणा भाजीपाला फळे, धान्य, दुध दुकाने, रेशन दुकाने दुपारी बारा ते तीन या वेळेतच सुरू राहतील. घरोघरी, हातगाडीवर, फेरीवाल्यांद्वारे  भाजीपाला विक्रिसाठी परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना मास्क वापरणे तसेच किमान दिड मिटरचे सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.  सार्वजनिक ठिकाणी विना मास्क अथवा रूमाल न बांधता वावरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे सर्व कटाक्षाने टाळावे.
अत्यंत निकडीचे असल्यास घराबाहेर निघावे. जीवनावश्यक वस्तू घरपोहोच उपलब्ध होण्याची सुविधा जास्तीत जास्त वापरावी. फारच महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जायचे असेल तरी वाहनांचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. असेही डॉ. मंगरूळे म्हणाले. 

Web Title: Lockdown will be held in Sangamner taluka till May 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.