लोहसर-पवळवाडीचा रस्ता रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:58+5:302020-12-30T04:27:58+5:30
डोंगराच्या पायथ्याशी लोहसर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पवळवाडी ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत होते. पावसाळ्यात -उन्हाळ्यात चार किलोमीटर ...
डोंगराच्या पायथ्याशी लोहसर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पवळवाडी ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत होते. पावसाळ्यात -उन्हाळ्यात चार किलोमीटर पायी प्रवास करीत. २० ते २५ वर्षे ग्रामस्थ फक्त लोकप्रतिनिधीकडे रस्त्याचीच मागणी करीत असत. अखेर दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक निधीतून पवळवाडी गावचा ३.८ कि.मी. रस्ता मंजूर झाला. या रस्त्यासाठी २ कोटी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊन २ वर्षे होत आली; मात्र रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याने रस्ता अद्यापही अपूर्णच आहे. रस्त्याचा शेवटचा सुरुवातीचा टप्पा तर अजूनही भराव व खडीकरण केलेला नाही. लोहसर- पवळवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांना आणखी किती वर्षे वाट पहावी लागेल, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
या रस्त्याचे काम जलदगतीने करून एक महिन्यात पूर्ण करावे, अन्यथा ग्रामस्थ आता तीव्र आंदोलन करतील, असा इशारा तेजीपाल रोमन, शंकर कापसे, साहेबराव तोडमल, काशिनाथ वांढेकर, छबू कापसे, म्हातारदेव रोमन, बापू रोमन मनसुख चव्हाणसह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.
...
लोहसर- पवळवाडी रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. रस्त्याचा सुरुवातीचा व शेवटचा टप्पा तर अजूनही भराव खडीकरण केलेला नाही. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- आदिनाथ रोमन, माजी ग्रामपंचायत सदस्य.
...
जानेवारीमध्ये या रस्त्याच्या कामाला गती देऊन दोन महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
-महेंद्र मुंगसे, पंतप्रधान सडक योजना.
...
२९लोहसर रोड
...
ओळी-लोहसर-पवळवाडीच्या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे.