Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:39 PM2019-04-05T15:39:52+5:302019-04-05T15:47:15+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल ३८ अर्जापैंकी छाननीत सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. यात धनश्री सुजय विखे यांच्या अर्जाचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2019: After six applications with Dhanashree Vikhan | Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद

Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल ३८ अर्जापैंकी छाननीत सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. यात धनश्री सुजय विखे यांच्या अर्जाचा समावेश आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ३१ जणांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राुल व्दिवेदी यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये सहा जणांचे अर्ज अवैध ठरले.
धनश्री विखे यांनी डॉ.सुजय विखे यांना पर्यायी म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होताा. परंतु सुजय विखे यांचाच अर्ज वैध ठरल्याने धनश्री यांचा अर्ज बाद करण्यात आला. याशिवाय अपक्ष भागवत धोंडिबा गायकवाड, विलास सावजी लाकूडझोडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे पोपट गंगाधर दरेकर, भारतीय मायनॉरिटीज पार्टीचे जाकीर रतन शेख, हिंदू एकता आंदोलन पार्टीचे सुदर्शन शितोळे यांचेही अर्ज बाद झाले आहेत. आता २६ जणांचे वैध ठरले असून ८ एप्रिलपर्यत अर्ज माघारी घेता येणार आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019: After six applications with Dhanashree Vikhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.