Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:19 AM2019-04-05T11:19:27+5:302019-04-05T12:23:01+5:30

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

Lok Sabha Election 2019: Ahmednagar mla fight | Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक

अण्णा नवथर
अहमदनगर: अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मागील दोन निवडणुकांमधील मतांची टक्केवारी पाहता या मतदारसंघावर भाजपचा पगड असल्याचे दिसते़ परंतु, मोदी लाट ओसरल्याने स्थानिक नेत्यांची दमछाक होणार आहे़
आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुक्यांना सभांचा धडाका सध्या सुरू आहे़ स्थानिक नेत्यांकडून आपल्या तालुक्यातून निश्चितच मताधिक्य देऊ, असे छातीठोकपणे सांगितले जात आहे़ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य नाही़ त्यामुळे त्यांची भिस्त आता स्थानिक नेत्यांवरच आहे़ २००९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा ४६ हजार ७३१ मतांनी पराभव केला होता़ २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होती़ त्यामुळे गांधी यांच्या मतांची टक्केवारी वाढून त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा २ लाख ९ हजार मतांनी पराभव केला होता़ २००९ मध्ये गांधी यांना राहुरी आणि पारनेर वगळता शेवगाव- पाथर्डी, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेडमधून काही हजारांचे मताधिक्य मिळालेले होते़ २०१४ मध्ये गांधींना शेवगाव-पाथर्डी वगळता पाच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते़ शेवगाव- पाथर्डीत मोदी लाटेचा परिणाम झाला नाही़ २००९ मध्ये राष्टÑवादीचे उमेदवार कर्डिले यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून १४ हजार, तर पारनेरमधून ९०३ चे मताधिक्य मिळालेले होते़ २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनी पाथर्डीतून ११ हजारांचे मताधिक्य घेतले होते़ परंतु, इतर पाच मतदारसंघांनी त्यांना साथ दिली नाही़ त्यामुळे त्यांचा पराभव झाला़ मागील दोन निवडणुकांतील पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे़ त्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीने सहा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे़ भाजपविरोधी मते मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे़ परंतु, भाजपने काँग्रेसचे डॉ़ सुजय विखे यांचा पक्ष प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली आहे़ त्यामुळे कुठल्या मतदारसंघातून कुणाला मताधिक्य राहील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्थानिक नेत्यांची आपआपल्या उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी दमछाक होणार आहे.

शिवसेना-भाजप युती
पाथर्डी : आमदार मोनिका राजळे
राहुरी : शिवाजीराव कर्डिले
पारनेर : आमदार विजय औटी
नगर शहर : माजी आमदार अनिल राठोड
श्रीगोंदा : बबनराच पाचपुते
कर्जत - जामखेड : पालकमंत्री राम शिंदे

काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी
शेवगाव: माजी आमदार चंद्रशेखर घुले
राहुरी : प्राजक्त तनपुरे
पारनेर : सुजित झावरे, निलेश लंके
नगर शहर : आमदार अरूण जगताप,
माजी आमदार दादा कळमकर
श्रीगोंदा : आमदार राहुल जगताप,
राजेंद्र नागवडे
कर्जत : जामखेड- रोहित पवार, मधुकर राळेभात, दत्ता वारे, राजेंद्र गुंड, गुलाब तनपुरे़


विधानसभा मतदारसंघनिहाय मते २०14
शेवगाव- पाथर्डी
राष्टÑवादी 1,01,543
भाजप 89,764
मताधिक्य- भाजप 11,779

राहुरी
राष्ट्रवादी 60,350
भाजप 1,01,751
मताधिक्य- भाजप 41,701

कर्जत-जामखेड
भाजप 10,6552
राष्ट्रवादी 65,373
मताधिक्य- भाजप 41,179


श्रीगोंदा
राष्ट्रवादी 55,389
भाजप 11,3643
मताधिक्य- भाजप 58,254

पारनेर
भाजप 1,0,3308
राष्टÑवादी 61,921
मताधिक्य- भाजप 21,087

नगर शहर
भाजप 89,258
राष्टÑवादी 50,993
मताधिक्य- भाजप 38,265

Web Title: Lok Sabha Election 2019: Ahmednagar mla fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.