Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 04:46 PM2019-03-24T16:46:29+5:302019-03-24T16:47:08+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप सोडणार नाही. जो उमेदवार दिला आहे, त्याचा प्रचार करणार आहे. भाजपच्या विचारानेच पुढे जाणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे मत भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

Lok Sabha Election 2019: BJP campaign for a given candidate: Dilip Gandhi | Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप सोडणार नाही. जो उमेदवार दिला आहे, त्याचा प्रचार करणार आहे. भाजपच्या विचारानेच पुढे जाणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे मत भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
भाजपाने तिकिट नाकारल्यामुळे गांधी समर्थकांचा आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घोषित केला. यावेळी दिलीप गांधी बोलत होते. मुलाच्या निर्णयावर दिलीप गांधी यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
खासदार दिलीप गांधी म्हणाले, सुवेंद्रला त्याचा विचार करण्यास स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तो त्याचा विचार करील. मी मात्र भाजप सोडणार नाही. देशाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी पक्ष देईल ते काम करण्यास मी तयार आहे. भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही मी करणार आहे. यावेळी अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यावरही गांधी यांनी निशाणा साधला. दुस-याच्या घरात राहून आलेल्यांना पतिव्रता कसे म्हणता येईल, अशी टीका आगरकरांवर केली.

Web Title: Lok Sabha Election 2019: BJP campaign for a given candidate: Dilip Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.