Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 03:51 PM2019-03-24T15:51:55+5:302019-03-24T16:18:25+5:30
भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली.
अहमदनगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी भुमिका जाहीर केली. यावेळी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते.
पक्षाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारून डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर गांधी समर्थक नाराज झाले. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भुमिका जाहीर केली. यावेळी सुवेंद्र गांधी यांनी विखे यांच्यावर टीका केली. भाजपाचा कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढणार आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद घेऊन जनसामान्यात जाणार आहे, असेही गांधी यांनी यावेळी सांगितले. सुवेंद्र गांधी यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविली होती.