Lok Sabha Election 2019 : मी केलेल्या कामांचा हा घ्या हिशोब : संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:50 AM2019-04-10T11:50:48+5:302019-04-10T11:52:30+5:30
शहरासह ग्रामीण भागासाठी साडेचार वर्षांत काय कामे केली, या विरोधकांनी केलेल्या आरोपाला नगर तालुक्याच्या विकासासाठी १५ कोटींची कामे केली, असे सांगून राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागासाठी साडेचार वर्षांत काय कामे केली, या विरोधकांनी केलेल्या आरोपाला नगर तालुक्याच्या विकासासाठी १५ कोटींची कामे केली, असे सांगून राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी या कामांची यादीच जाहीर केली़
लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील नागापूर औद्योगिक वसाहतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, प्रताप शेळके, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके, रावसाहेब शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते. या मेळाव्यास रमेश भांबरे, वसंतराव ठोकळ, संजय जपकर, वसंत पवार, अरुण ठाणगे, आसाराम कातोरे, सूर्यभान पोटे, डॉ. बबनराव डोंगरे, घनश्याम म्हस्के, देवा होले, सुनील कोठावळे, ज्ञानदेव दळवी, साहेबराव बोडखे, गोरख दळवी, बाबासाहेब गुंजाळ, गणेश साठे, दादासाहेब दरेकर, नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, सतीश बारस्कर, दत्तू जगताप, दत्ता तापकिरे, गजानन भांडवलकर आदी उपस्थित होते़ आ़ जगताप यांनी यावेळी विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले़ ते म्हणाले, केडगावच्या अंबिका हॉटेलपासून ते सोनेवाडी, अकोळनेर ते सारोळा कासार या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ५२ लाख रुपये, तपोवन रस्त्यासाठी ३ कोटी, केडगाव लिंकरोड रस्त्यासाठी २ कोटी २५ लाख, कायनेटिक ते बुरूडगाव रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, एम.आय.डी.सी. ते निंबळक रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख, नालेगांव भागातील वारुळाचा मारुती ते निंबळक या जुन्या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी २ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर शहरातून परिसरातील गावात जाणाऱ्या व परिसरातील गावातून शहरात येणाऱ्या नागरिकांची सोय होणार असल्याचे ते म्हणाले.