Lok Sabha Election 2019 : भुमिका ठरवू नका, कामाला लागा : अ‍ॅड. अभय आगरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 07:05 PM2019-03-23T19:05:25+5:302019-03-23T19:08:07+5:30

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवण्याच्या फंदात पडू नका.

Lok Sabha Election 2019: Do not decide the role, start party work: Adv. Abhay Agarkar | Lok Sabha Election 2019 : भुमिका ठरवू नका, कामाला लागा : अ‍ॅड. अभय आगरकर

Lok Sabha Election 2019 : भुमिका ठरवू नका, कामाला लागा : अ‍ॅड. अभय आगरकर

अहमदनगर : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवण्याच्या फंदात पडू नका. पक्षाचा आदेश पाळा आणि निवडणूक प्रचाराच्या कामाला लागा, असा सल्ला खासदार दिलीप गांधी यांना भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी दिला आहे.
यावेळी डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अभय आगरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आगरकर बोलत होते.
आगरकर म्हणाले, भाजप पक्षामध्ये वरीष्ठ नेत्यांचा आदेश चालतो. त्यांच्या आदेशावरच भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते काम करतात. पक्षाचे निष्ठावंत म्हणत असाल तर तुम्ही पक्षाचा प्रचार सुरू केला पाहिजे. उमेदवारी नाकारल्यामुळे भुमिका ठरविण्यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी रविवारी समर्थकांची बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आगरकर यांनी खासदार गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Do not decide the role, start party work: Adv. Abhay Agarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.