Lok Sabha Election 2019 : विरोधीपक्ष नेते सोबत असल्यामुळे काळजी नाही : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:45 PM2019-04-07T12:45:07+5:302019-04-07T12:47:01+5:30
मी मंत्री झाल्यानंतर जामखेड तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आल्या. तालुक्यात फक्त मोजकेच लोक विरोधात होते.
हळगाव: मी मंत्री झाल्यानंतर जामखेड तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आल्या. तालुक्यात फक्त मोजकेच लोक विरोधात होते. त्यातील काँग्रेसचेही नेते आणि कार्यकर्ते आता आपल्यासोबत आले आहेत. विरोधी पक्षनेतेही आपल्यासोबत असल्यामुळे काळजी करायचे कारण नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील प्रचारसभेत दिले.
आज हळगाव येथे भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलत होते.
शिंदे म्हणाले, पुर्वी लाखात विकास कामे सांगितली जायची. परंतू आता कोटीत विकास कामे सांगावे लागत आहेत. ही कमाल भाजपा सरकारची आहे. गेल्या सत्तर वर्षात जेवढी कामे झाली नाहीत त्यापेक्षा अधिक कामे मागील पाच वर्षांत मतदारसंघात केली. त्यामुळे जनता पाठीशी आहे.