Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:46 AM2019-04-10T11:46:06+5:302019-04-10T11:47:16+5:30

दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले.

Lok Sabha Election 2019: scarcity of industrial developmenta : Sujay Vikhe | Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

Lok Sabha Election 2019 : दहशतीमुळे औद्योगिक विकास खुंटला : सुजय विखे

अहमदनगर : दहशतीमुळे अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीतील कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले़ त्यामुळे अनेक कामगार देशोधडीला लागले. औद्योगिक वसाहतीचा उपयोग राजकारणासाठी केला गेल्याची टीका महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील दौऱ्यात केली़ तसेच या औद्योगिक वसाहतीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़
लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नगर तालुक्यातील जखणगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, बाळासाहेब हराळ, अरूण होळकर आदी उपस्थित होते. विरोधकांवर तोफ डागताना विखे म्हणाले, अहमदनगर औद्योगिक वसाहतीला उच्च दर्जा प्राप्त झाला होता. नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठे कारखाने सुरू होते़ मात्र स्थानिक नेत्यांनी युनियनच्या नावाखाली दहशत निर्माण केली़ त्यामुळे त्रस्त उद्योजक कारखाने बंद करून निघून गेले़ पुरेशा पायाभूत सुविधा असताना येथील वसाहत ओस पडली़ परिणामी तरुणांच्या हाताला काम राहिले नाही़ विरोधकांनी यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठविला नाही़ त्यामुळेच नगरचा औद्योगिक विकास खुंटल्याचे विखे म्हणाले़
जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये युवक उच्च शिक्षण घेत आहेत़ परंतु, त्यांना जिल्ह्यात रोजगार मिळत नाही़ त्यामुळे त्यांना नोकरीसाठी शेजारच्या जिल्ह्यात जावे लागते़ शिक्षण पूर्ण केलेले हजारो विद्यार्थी दरवर्षी नोकरीसाठी पुणे, मुंबईत दाखल होत आहेत़ पण, यापुढे तरुणांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता पडणार नाही़ या जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करून औद्योगिक वसाहतीचा दर्जा उंचावणार असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले़ नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती, हमीदपूर, जखणगाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा आदी भागातील मतदारांशी विखे यांनी संवाद साधला़ यावेळी विजय औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली़

Web Title: Lok Sabha Election 2019: scarcity of industrial developmenta : Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.