Lok Sabha Election 2019 : शिर्डी : छाननीमध्ये 28 उमेदवारांचे अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:58 PM2019-04-10T17:58:15+5:302019-04-10T18:00:52+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 30 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले. आज छाननीमध्ये 28 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले.
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 30 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले. आज छाननीमध्ये 28 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले.
सदाशिव रामचंद्र वाकचौरे व अंबादास लक्ष्मण सरोदे यांचा अपक्ष अर्ज वैध तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर दोन उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणुक यंत्रणेने दिली.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - कांबळे भाऊसाहेब मल्हारी (इंडियन नॅशनल काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), अॅड.अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष) , डॉ. अरुण प्रभाकर साबळे (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), क्रांती अरुण साबळे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष), गायकवाड अशोक रामचंद्र (अपक्ष), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष), बागूल भुमिका आशिष (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), राजेंद्र रत्नाकर वाकचौरे (अपक्ष), वाकचौरे भाऊसाहेब राजाराम (अपक्ष), वाघमारे प्रकाश गुलाब (अपक्ष), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (अपक्ष), सरोदे अंबादास लक्ष्मण (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष) वैध ठरले आहेत.