Lok Sabha Election 2019 : तुम्ही बरोबर आहात... चिंता नाही : पुत्रासाठी राधाकृष्ण विखे यांची मतदारसंघामध्ये फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:46 PM2019-03-20T13:46:01+5:302019-03-20T13:52:22+5:30

‘मी काय बोलतो हे टिपण्यासाठी माझ्या चारहीबाजूंनी कॅमेरे आहेत. त्यामुळे मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही बरोबर आहात. त्यामुळे मला चिंता नाही,

Lok Sabha Election 2019: You are right ... Radhakrishna Vikhe in ahmednagar | Lok Sabha Election 2019 : तुम्ही बरोबर आहात... चिंता नाही : पुत्रासाठी राधाकृष्ण विखे यांची मतदारसंघामध्ये फिल्डींग

Lok Sabha Election 2019 : तुम्ही बरोबर आहात... चिंता नाही : पुत्रासाठी राधाकृष्ण विखे यांची मतदारसंघामध्ये फिल्डींग

श्रीगोंदा :‘मी काय बोलतो हे टिपण्यासाठी माझ्या चारहीबाजूंनी कॅमेरे आहेत. त्यामुळे मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही बरोबर आहात. त्यामुळे मला चिंता नाही, असे मार्गदर्शन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना करत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील दौरा करत असून पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आज श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करत असून आपल्या समर्थकांना अलर्ट राहण्याचा संदेश देत आहेत. विखेंच्या दौ-यात भाजपासह काँग्रेसचे कार्यकर्ते ही सहभागी होत आहेत. पुत्र डॉ. सुजय विखे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी मतदारसंघात दौरा सुरु केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, घारगाव, बेलवंडी गावात त्यांनी बैठक घेतल्या. बेलवंडीमध्ये काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनील वीर यांनी ही लढाई विखे विरूध्द पवार अशी असल्याने आपल्याला विखे पाटलांच्या मागे उभे राहावे लागेल, असे सांगितले. अण्णासाहेब शेलार म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काँग्रेसमधील काही नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. आमचा विखे हाच पक्ष आहे. बाबासाहेब नाहाटा यांनीही यावेळी विचार मांडले. काष्टीत साईसेवा पतसंस्थेत सदाशिव पाचपुते यांचीही भेट त्यांनी घेतली. कैलास पाचपुते यांची निवासस्थानी भेट घेतली. काष्टी सहकारी सोसायटीत भगवानराव पाचपुते समर्थकांबरोबर संवाद साधला. बेलवंडीत दिलीप रासकर यांची भेट घेतली. जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, विठ्ठलराव काकडे, बाळासाहेब गिरमकर, सिध्देश्वर देशमुख, संतोष रोडे, सचिन कोकाटे, सुनील महाडीक उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019: You are right ... Radhakrishna Vikhe in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.