Lok Sabha Election 2019: प्राजक्त तनपुरे यांचा ‘यू टर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:30 PM2019-03-16T12:30:47+5:302019-03-16T12:31:43+5:30
नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी यू टर्न घेत आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़
राहुरी : नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी यू टर्न घेत आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़ पाच महिन्यापूर्वी नगराध्यक्ष तनपुरे यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते़
नगराध्यक्ष तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली होती़ राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे खासदारकीसाठी कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती़
याशिवाय मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी प्रसाद तनपुरे यांच्या नावाची चर्चा केली होती़ विखे विरुद्ध तनपुरे असा सामना चर्चेत असताना प्राजक्त तनपुरे यांनी आता लोकसभा लढविण्यास नकार दिला आहे़
खासदारकीऐवजी नगराध्यक्ष तनपुरे हे आता आमदारकीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविणार आहे़ राहुरी मतदारसंघात आमदार शिवाजी कर्डिले विरूध्द नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे असा सामना रंगणार आहे़ गेल्या निवडणुकीत डॉ़उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होते़ मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता़ या पराभवाचा वचपा नगराध्यक्ष
प्राजक्त तनपुरे हे काढण्याच्या तयारीत आहेत.