लोखंडेंना खासदारकीची ‘लॉटरी’

By Admin | Published: May 17, 2014 12:21 AM2014-05-17T00:21:48+5:302014-05-17T00:58:13+5:30

अहमदनगर: एकीकडे देशात मोदीची लाट असताना शिर्डी मतदारसंघात स्थानिक प्रस्थापित नेत्यांविरोधात उसळलेला जनक्षोभ मतात परावर्र्तित करण्यात यश मिळवणार्‍या

Lokhandwala's 'lottery' | लोखंडेंना खासदारकीची ‘लॉटरी’

लोखंडेंना खासदारकीची ‘लॉटरी’

अहमदनगर: एकीकडे देशात मोदीची लाट असताना शिर्डी मतदारसंघात स्थानिक प्रस्थापित नेत्यांविरोधात उसळलेला जनक्षोभ मतात परावर्र्तित करण्यात यश मिळवणार्‍या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेना १ लाख ९९ हजार ९२२ मतांच्या मोठ्या फरकाच्या विजयासह खासदारकीची लॉटरी लागली. लोखंडे पराभूत झाले, तर तो ‘चमत्कार’ ठरेल, अशी चर्चा मतदारसंघात जाहीरपणे सुरु झाली होती. आघाडीचे पराभूत उमेदवार भाऊसाहेब वाकचौैरे शिवसेना सोडून ज्या विश्वासाने काँग्रेसमध्ये आले, तो काळ वगळता ते कधीही जिंकण्यासाठी लढताहेत, हे जाणवलेच नाही. अर्थात त्यांच्याविरोधात उसळलेल्या जनमताचाच हा परिणाम! भाऊसाहेब वाकचौरे २००९ मध्ये एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत खासदार झाले. त्यांना आपली खासदारकी कोणत्याही परिस्थितीत यंदा पुन्हा राखायची होती. सहा महिन्यापूर्वी सेनेची राज्यातील अवस्था तशी विस्कळीतच! या परिस्थितीत वाकचौरे काँग्रेसच्या तिकिटावर आणि माजी खासदार बाळासाहेब विखे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे या पिता-पुत्र्यांच्या राजकीय ‘सामर्थ्या’चा वापर करत पुुढील डाव खेळण्यासाठी आतूर होते. काँग्रेसकडेही उमेदवार नव्हता. योग जुळून आला आणि वाकचौरेंनी शिवसेना सोडली. पण हे करताना मतदारराजाच्या क्षोभाचा अंदाज घेण्यात ते चुकले, हे आता निकालाने अधोरेखित केले आहे. अडखळत सुरुवात करतही मतदार राजाने दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर सदाशिव लोखंडे खासदार झाले आहेत. लोखंडेंना ५ लाख ३२ हजार ९३६ तर पराभूत वाकचौरेंना ३ लाख ३३ हजार १४ मते मिळाली. लोखंडे १ लाख ९९ हजार ९२२ मतांनी विजयी झाले.लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीने मतांची आघाडी घेतली आहे. त्यात उत्तरेतील तीनही मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीने अकोलेत ४ हजार ५९१, संगमनेरमध्ये २६ हजार २७० तर शिर्डी विधानसभा मतदारसंघात ९ हजार ५०९ मतांची आघाडी घेतली आहे. यावरुन निकालाचा कल कसा सेनेच्या बाजूने झुकला, याची स्पष्ट कल्पना येते. दरम्यान, ‘आप’सह अन्य पक्षांना अपेक्षीत मतसंख्याही गाठता आली नाही. या निवडणुकीने प्रस्थापितांना इशारा दिला आहे. अगामी काळातील राजकीय समिकरणेही बदलतील. महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीच विजय निश्चित झाला होता. या मतदारसंघातील एकमेव पक्षाचे आमदार अशोक काळे यांनी पाणीप्रश्न मार्गी लावलेला आहे. यामुळे मताधिक्य मिळाले. याच जिल्ह्यात १५ वर्ष आमदार आणि जिल्हा बँकेत काम केलेले असल्याने अनेकांनी मदत केली. - सदाशिव लोखंडे (शिवसेना) या कारणांमुळे मिळाला विजय भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडून दिलेला ‘धोका’ हा मुद्दा शिवसैनिकांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा केला. खरेतर तोच जोरदारपणे ‘कॅश’ करण्यात यश आले. प्रस्थापित राजकारणाला विरोध करत जनतेची सहानुभूती जिंकण्यात महायुतीला यश आले. त्यामुळे तयारी आणि प्रचार यासाठी वेळ न मिळूनही लोखंडेचा विजय निश्चित झाला. विस्कळीत झालेली सेना सहा महिन्यापूर्वी वाकचौरेंनी पक्ष सोडल्यामुळे कमालीची एकजूट झाली. सामान्य शिवसैैनिक अत्यंत त्वेषाने प्रचारात उतरला. त्यांना विरोधकांतील नाराजांचीही मदत झाली.

Web Title: Lokhandwala's 'lottery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.