लोकमत ‘आयकॉन्स’ सोहळा विशेष
By Admin | Published: May 16, 2016 12:06 AM2016-05-16T00:06:43+5:302016-05-16T00:07:16+5:30
नगर-मनमाड रोडवरील हुंडेकरी लॉनवर शनिवारी सायंकाळी दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला.
राज्यकर्ते, उद्योजक दोघेही कमी पडले : विखे
अहमदनगर : नगरच्या उद्योग वाढीत राज्यकर्ते व उद्योजक हे दोघेही कमी पडले. उद्योजकांनीही स्वत:पुरती प्रगती सीमित ठेवली. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. सुपा, मिरजगाव, श्रीगोंदा येथे एमआयडीसी विस्तारीकरणाला संधी आहे. राजकारणाच्या पलीकडे जावून विकासाकडे पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या सोहळ्यात केले.
विखे म्हणाले, उत्तम काम करणाऱ्या, कर्तृत्त्व गाजविणाऱ्या व्यवसाय-उद्योजकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याचा ‘लोकमत’चा उपक्रम अभिनव आहे. महाराष्ट्रातील असा अभिनव उपक्रम राबविणारे ‘लोकमत’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. फिरोदिया यांनी नगरला ‘लुना’ची निर्मिती केली. बदलत्या काळाप्रमाणे अगुस्ता कंपनीशी करार करून ते आता २६ लाख रुपये किमतीची दुचाकी नगरला उत्पादित करणार आहेत. पद्मश्री विखे पाटील यांनी सहकाराचे बीज रोवले. याच पद्धतीने जिल्ह्याचा विविध अंगाने विस्तार झाला. अनेक उद्योजक जिल्ह्याचा नावलौकिक वाढवित आहेत. अशाच शून्यातून जग उभे करणाऱ्या आयकॉन्सचा सन्मान होत आहे.
नगर औद्योगिकदृष्ट्या मागासलेले आहे. एमआयडीसीचा इथे विस्तार झाला नाही. कामगार नेते दत्ता सामंत यांच्या आंदोलनाने मुंबईच्या मिलची अधोगती झाली. याच पद्धतीच्या आंदोलनामुळे नगरच्या अनेक कंपन्यांचा विस्तार थांबला. अरुण फिरोदिया यांच्याबाबत घडलेला प्रसंगही नगरचे लोक अजून विसरले नाहीत. उद्योगाचा विकास करण्यासाठी राज्यकर्ते, उद्योजक कमी पडले. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच राजकारण असावे. त्याची लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आखली पाहिजे. नगरला औद्योगिक वातावरण तयार होणे गरजेचे आहे. जो बदलतो, तोच यश मिळवितो. शासन कोणत्या पक्षाचे आहे, हे महत्त्वाचे नाही. ते लोकांच्या किती मदतीला येते, ते महत्त्वाचे आहे. राजेंद्र दर्डा हे जुने मित्र असून ‘लोकमत’ने हाती घेलेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे.
‘लोकमत’चे आयकॉन्स जिल्ह्याचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर
‘लोकमत’ने सतत नवनवीन संकल्पना राबवून सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यामुळेच माध्यमक्षेत्रात या वृत्तसमुहाचे वेगवेळेपण व लौकिक आहे. ‘लोकमत’ने उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा केलेला गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असून हे आयकॉन्स जिल्ह्याचे ब्रॅण्ड अम्बेसिडर ठरतील, असे गौरवोद्गार विखे यांनी काढले.
नगरच्या उद्योगांचा भविष्यकाळ उज्ज्वल : राम शिंदे
अहमदनगर : मुंबई-दिल्ली कॅरिडॉरमध्ये नगरचा समावेश झालेला आहे. जिल्ह्यात एमआयडीसीचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे नगरच्या उद्योग क्षेत्राचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, परिस्थितीची जाणीव ठेवून विकास करीत नाहीत, असे उद्योग मागे पडले आहेत. आधुनिकता आणि कल्पकतेअभावी अनेक नावारुपाला आलेले उद्योग बाजूला फेकले गेले आहेत. मात्र, ज्या व्यक्तींनी आपले लक्ष्य भेदले आणि ध्येय साध्य केले, असे ‘लोकमत’ने निवडलेल्या आॅयकॉन्सचे जीवन प्रेरणादायी आहे. ‘लोकमत’ने निवडलेले आयकॉन्स असामान्य कर्तृत्त्वाचे आहेत. त्यांचे जीवन मार्गदर्शक आणि आदर्श आहे. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात इतिहास घडविला आहे. जीवनात घेतलेल्या त्यांच्या परिश्रमाचा ‘लोकमत’ने यथोचित सन्मान केला आहे. परिस्थिती बदलण्याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. राज्यातील हा अग्रेसर वृत्तसमूह आहे. ‘लोकमत’ने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. नगर हे पुणे-औरंगाबादच्यामध्ये असूनही विकास झाला नाही, ही खंत आहे. मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्यातील एमआयडीसी विस्तारीकरणासाठी लक्ष घातले आहे. जपानशी करार करून सुपा येथे एमआयडीसीचे विस्तारीकरण होत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोण आहेत, हे महत्त्वाचे नाही, तर जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, अशीच विखे पाटील व माझी भावना आहे.
प्रश्न सुटले नाही तर
विखे पाटील आहेतच...
काही प्रश्न सुटले नाही तर सुदैवाने विरोधी पक्षनेते आपल्याच जिल्ह्यातील आहेत. संसाराच्या चाकाप्रमाणे लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष रथाची दोन चाके आहेत. विरोधी पक्षाच्या सूचना-मार्गदर्शन तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण ठेवून जिल्हा प्रगतीच्या दृष्टीने आघाडीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. सहा खात्यांचा मंत्री असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीचा न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न राहणार आहे. जुन्या उद्योगांच्या विकासासाठी लक्ष घालण्याची खरी गरज आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. दिग्गजांचा हा जिल्हा आहे. येथील प्रत्येक उद्योजक जीवापाड परिश्रम करीत आहे. त्यामुळे नगरला मोठे भविष्य असल्याचे शिंदे म्हणाले.
काळाच्या गतीने धावा : राजेंद्र दर्डा
अहमदनगर : काळासोबत धावण्यात मागे राहिलेल्या अनेक जागतिक कंपन्या आता दिसत नाहीत. त्यामुळे उद्योजक व व्यावसायिकांनी काळाबरोबर धावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.
दर्डा यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्याच्या वैभवशाली वारशाचा आढावा घेतला. ते म्हणाले, वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सीमित नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही ‘लोकमत’ची प्रारंभीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने पुणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा सर्वच जिल्ह्यातील ‘आॅयकॉन्स’चे कॉफीटेबल बुक काढून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. ‘लोकमत’ सातत्याने जनतेसोबत असल्यानेच हा आघाडीचा वृत्तसमूह बनला आहे. ‘लोकमत’ने आता ‘आॅनलाईन’ क्षेत्रातही भरारी घेतली आहे.
नगर जिल्ह्याला पाचशेहून अधिक वर्षांचा इतिहास असून या जिल्ह्याला अध्यात्म, सामाजिक, राजकीय, साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, आचार्य आनंदऋषीजी, साईबाबा यांचा सहवास या जिल्ह्याला लाभला आहे. या मातीने अनेक रत्न राज्याला व देशाला दिले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात प्रवरानगरला काढला. तसेच ‘व्हिडीओकॉन’ व ‘कायनेटिक’ सारखे मोठे उद्योग ही याच जिल्ह्याची देण आहे. भाऊसाहेब फिरोदिया, बाळासाहेब भारदे व ना. स. फरांदे यांच्या रुपाने जिल्ह्याने विधानसभेला व विधानपरिषदेला सभापती दिले. रामराव आदिकांमुळे जिल्ह्याला उपमुख्यमंत्रीपद मिळाले.
आजही अण्णा हजारे, पोपटराव पवार हे मान्यवर देशपातळीवर समाजाला दिशा देत आहेत. या जिल्ह्याला भविष्यात विकासाची मोठी संधी आहे. राज्यकर्त्यांनी उद्योग, व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कल्पकतेच्या आधारे उंच भरारी
स्वत:चे इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या कंपन्या केवळ कल्पकतेच्या आधारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. स्वत:ची एकही टॅक्सी नसलेली उबर जगातील सर्वात मोठी टॅक्सी आॅपरेटर कंपनी आहे. एअर बी अॅण्ड बी अर्थात ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधील एकही रुम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वात जास्त रुम विकणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. ‘लोकमत’ या बदलांची माहिती वाचकांपर्यंत दररोज पोहोचवत आहे. आता स्पर्धक व शत्रू मानण्याचा काळ नाही. एकमेकाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करुन घेण्याचा हा काळ असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
अहमदनगर : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर या सोहळ्याला शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील निमंत्रितांची मांदियाळी जमली होती. नगरच्या इतिहासातील एक देखणा सोहळा अनुभवायला मिळाला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
समारंभासाठी आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, अॅटो क्लस्टरचे संचालक कारभारी भिंगारे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर, जिल्हा सहउपनिबंधक दिगंबर हौसारे, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, शिक्षण बँकेचे माजी संचालक नवनाथ भापकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त उत्तमराव करपे, शिवाजी शिंदे, महावितरणचे सावेडी उपविभागाचे अभियंता भारत पवार, मार्क कन्स्ट्रक्शनचे संचालक मकरंद कुलकर्णी, डॉ़ रणजित सत्रे, डॉ़ गोपाळ बहुरुपी, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रदीप हलसगीकर, श्रीधर अंभोरे, जयंत येलूलकर, बापूसाहेब बाचकर, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, पत्रकार महेश देशपांडे, सिटी केअरचे संचालक डॉ़ संदीप सुराणा, डॉ़ हेमा सुराणा, नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ़ बापूसाहेब कांडेकर, नोबेलचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजय निकम, सावली संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे, साई एन्टरप्राजेसचे संचालक गणेश गायकवाड, प्रॉमिनंटचे संचालक जावेद शेख, संकलेचा प्रॉपर्टीजचे संचालक दिनेश संकलेचा, विजय एन्टरप्रायजेसचे संचालक निखिल नहार, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र अलुरी, ओस्तवाल किचनचे संचालक सचिन ओस्तवाल, साई स्पोर्टस्चे संचालक शैलेश गवळी, आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे, राम एजन्सीजचे संचालक राम मेंघाणी, हुंडेकरी उद्योग समूहाचे संस्थापक करिमभाई हुंडेकरी व संचालक वसिम हुंडेकरी, पाअुलबुद्धे महाविद्यालयाचे देवदत्त पाअुलबुद्धे, मराठा सायकलचे संचालक प्रितम बागवानी, किचन प्लास्टचे संचालक योगेश मुनोत, चैतन्य कन्सस्ट्रक्शनचे संचालक आबासाहेब कदम, गरुड हॉस्पिटलचे संचालक डॉ़ प्रकाश गरुड, पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे फौंडेशन तांत्रिक संचालक डॉ़ पी़ एम़ गायकवाड व मेडिकल उपसंचालक डॉ़ अभिजित दिवटे, प्राध्यापक बाळासाहेब निर्मळ, राजकुमार सरोदे, स्नेहल निर्मळ, कॉम्प्युटर व्हिजनचे श्रीकांत सावंत, चंदूकाका ज्वेलर्सचे संचालक अमित कोठारी, साधना कोठारी.
कराचीवाला उद्योग समूहाचे संचालक विशाल आणि निखिल कराचीवाला, चंदूकाका सराफ संचालक आनंद कोठारी.
निर्मल अॅडस्चे संस्थापक रमेश बाफना, क्लासिक पब्लिसिटीचे संचालक मनोज गुगळे, आशा पब्लिसिटीचे संचालक सुरेंद्र मुथ्था, अभि पब्लिसिटीचे संचालक प्रफुल्ल मुथा, अॅडमॅजिकचे संचालक गुलशन अरोरा, जेएमजी संचालक जितेंद्र गांधी, सुदर्शन पब्लिसिटीचे संचालक नितीन देशमुख, साई अॅडस्चे संचालक कैलास दिघे, दिशान अॅडस्चे संचालक किशोर गांधी, ग्रीनटेक इन्फ्राटेलचे संचालक राहुल धापटकर, शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ राजकुमार देशपांडे़
आशा फिरोदिया, रिंकू फिरोदिया, निता गांधी, अश्विन गांधी, श्वेता गांधी, वैशाली चोपडा, सुधीर चोपडा, राजेंद्र चोपडा, वरुण चोपडा, सचिन बोरा, मोना बोरा, विजय बोरा, वैशाली बोरा, रसिक भंडारी, योगेश मालपाणी, विकी मुथ्था, मनिष फिरोदिया, राहुल देडा़.
नागेबाबा मल्टीस्टेटचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमित फिरोदिया, नागेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मणमलीकऱ, ज्योती दीपक, डॉ.किरण दीपक, डॉ.वैशाली दीपक, रश्मी अरुण, आशा गणेश, गणेश कोल्हार, स्वाती कांबळे, शुभंकर कांबळे, मोना कांबळे़, प्रियांका देशमुख, शेफाली जोशी, स्नेहलता डांगे, प्राध्यापक ज्ञानेश डांगे, पूनम डांगे, भगवानराव डांगे, शिवाजी देवढे, अशोक गाडे, डॉ़ एम़ वाय़ देशमुख, डॉ़ गुंजाळ, सचिन गिते, गिताराम म्हस्के, सतीशराव शिंदे, जालिंदर घनवटे, आनंद कटारीया, राजेंद्र शेळके, बाळासाहेब कोतकर, केतन लोंढे, मदनलाल देसरडा, चंपाबाई देसरडा, स्नेहा देसरडा, सचिन, सागर व रुपेश देसरडा, राजेंद्र देसरडा, संतोष कुवाड, सुभाष भंडारी, निर्मला भंडारी, प्रितम भंडारी, आनंद भंडारी, अमृत पटेल, कृष्णा भुतडा, अॅड़ अजित जाधव, डॉ़ शंकर लावडे, अंजली राऊत, अमेय राऊत, पूजा राऊत, अॅड़ अनिल ढगे, माजी जिल्हा न्यायाधीश संगीता ढगे, कलावती कोल्हे, राजविका कोल्हे, प्राचार्य राजेंद्र कापगते, प्रा़ साहेबराव दवंगे, प्रा़ गिरीष वट्टमवार, गणेश चांगण, इरफान सय्यद, शरदराव थोरात, रवींद्र बोरावके, सुरेश रासकर, सुशांत घोडके, योगेश वाणी़, गोपीनाथ निर्मळ, लिलावती निर्मळ, डॉ.विजय निर्मळ, डॉ.मेघा निर्मळ, जयश्री निर्मळ, किर्ती सेठी, पलक सेठी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दीपक त्रिभूवन, बाबासाहेब मुसमाडे, बादल सेठी, अमित महेंद्रू, अशिष महेंद्रू, सुमेश सहाणी, डॉ़ संदीप मुसमाडे, शिवअप्पा कपाळे, प्रवीण सोनी, नगरसेवक अनंत कदम, सुनील सोनवणे, शैलेश कदम, राकेश विजऩ
लक्ष्मीमाता मिल्कचे बाबासाहेब चिडे, कृष्णकन्हैया मिल्कचे विकास आढाव, अतुल लोखंडे, देवीभोयरचे सरपंच विकास सावंत, जवळेचे माजी सरपंच सुभाष आढाव, सुरेश पठारे़, रमेश पोखर्णा, स्मिता पोखर्णा, अजय पोखर्णा, मिताली पोखर्णा, सोनल पोखर्णा, इंदिरा गांधी, अलका मुथ्था, अलोक बोगावत, सिध्दार्थ सारडा, मनिष चोपडा, प्रशांत गांधी, अमित पोखर्णा़, प्रिया सोनटक्के, रामदास केदार, सतीष श्ािंदे, गव्हाणे, मनिष तिवारी, रमेशचंद्र छाजेड, रत्नप्रभा छाजेड, मंजू मुनोत, पियुष व कुशल मुनोत, सुनीत मुनोत, प्रांजल मुनोत, रवी अॅबट, सोनिया अॅबट, हरिष अॅबट, सुमेरू पॅकेजींगचे संचालक श्रीगोपाल जखोटीया.
शिंगवी चष्माघरचे संचालक अशोक शिंगवी, श्रीगोंदा-बगाडे ज्वेलर्सचे संचालक अशोकराव बगाडे, साईकृपा साखर कारखान्याचे संचालक अशोकराव दांगट, सनराईझ पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सतीश शिंदे, प्रगतशील शेतकरी मारुतीराव डाके, श्रीगोंदा दूध संघाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, वाडेगव्हाण सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक शेळके, जामखेड- नगरपरिषद गटनेते महेश निमोणकर, नगरसेवक सोमनाथ राळेभात, डॉ़ ज्ञानेश्वर झेंडे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, भाजपा अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष सलीम बागवान, भाजपाचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष मोतळकर, हिंदूस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेळके, सलीम तांबोळी, जुबेर शेख, संगमनेर- सुनीता कोडे, महानंदा प्लॅस्टीकचे संचालक दर्शन सोनी, कोणार्क कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र पाचे, मर्चंट बँकेचे संचालक सुभाष भांड, अमित भांड आदी उपस्थित होते.
सोहळ््याची काही क्षणचित्रे....
रम्य सायंकाळ, आकर्षक रोषणाई
नगर-मनमाड रोडवरील हुंडेकरी लॉनवर शनिवारी सायंकाळी दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला. रम्य हिरवळीवर महानगरच्या धर्तीवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाई तसेच समारंभस्थळी स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वांना अगदी जवळून सोहळ्याची अनुभूती घेता आली.
- ‘आयकॉन्स आॅफ अहमदनगर’, ‘लोकमत’ आणि ‘वेलकम’ या शब्दांनी सजलेली रांगोळी मनमोहक होती. शिक्षक अमोल बागूल यांनी ही रांगोळी रेखाटली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.
आयकॉनच्या स्टॅण्डी सोबत सेल्फी
२७ आॅयकॉन्सची छायाचित्रे असलेली पोस्टर्स (स्टॅण्डी) सोहळ्याच्या ठिकाणी लावण्यात आली होती. समारंभस्थळी येताना प्रत्येकजणाने या दालनाला भेट दिली. अनेकांनी आयकॉन्सच्या या स्टॅण्डीसोबत छायाचित्रे काढली. विखे पाटील व पालकमंत्र्यांनीही सर्व आयकॉन्सची पोस्टर्स न्याहाळली.
नगरचा लौकिक वाढविणारा सोहळा
सोहळ्यात राजेंद्र दर्डा, राम शिंदे, राधाकृष्ण विखे, अरुण फिरोदिया या सर्वांचीच भाषणे उत्तरोत्तर रंगत गेली. त्यामुळे उपस्थितांना भाषणांची मोठी मेजवानी मिळाली. निमंत्रित नगरकरांनी प्रारंभीपासून ते अखेरपर्यंत सोहळ्याचा आस्वाद घेतला.
सोहळ्यात प्रारंभी लीना केतकर व त्यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय स्व. जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन करून पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी टाळ््यांच्या कडकडाटात सोहळ््याचे शानदार उद्घाटन झाले. निवेदिका श्वेता हुल्ले यांच्या ओघवत्या निवेदनाने उपस्थितांची मने जिंकली.
बिझनेस आयकॉन आॅफ अहमदनगर या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ‘लोकमत’ने नामांकित केलेल्या अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ आऱ जे़ बार्नबस यांचा पुरस्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ़ एऩ आऱ सोमवंशी यांनी स्वीकारला़ यावेळी प्रा. रज्जाक सय्यद, ग्रंथपाल डॉ. फुगनर.
मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांचा पुरस्कार जोशी स्वीटस्चे संचालक अभिजित जोशी यांनी स्वीकारला़
गोदावरी खोरे केन ट्रान्सस्पोर्ट, प्रा़ लि़ चे चेअरमन आशुतोष काळे यांचा पुरस्कार कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन रोहमारे यांनी स्वीकारला़ यावेळी सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे उपस्थित होते़