लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:38 PM2020-08-06T13:38:25+5:302020-08-06T13:40:31+5:30

दहावीनंतर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाकडे वळावअहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.

Lokmat Interview: Sandhi-Chandrakant Bhosale in ITI in terms of skill development | लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

लोकमत मुलाखत : कौशल्य विकासाच्या दृष्टीने आयटीआयमध्ये संधी-चंद्रकांत भोसले

चंद्रकांत शेळके

------------

अहमदनगर : पारंपरिक शिक्षणातून रोजगाराचे साधन मिळण्यात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे रोजगाराभिमुख किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी दहावीनंतर विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मोठ्या संधी आहेत, अशी माहिती राहुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय)  प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी दिली.


आज प्रत्येक ठिकाणी कुशलतेने काम करणाºया अर्थात कौशल्यनिपुण कारागिरांची गरज आहे. हे कौशल्य आपल्या देशातील आयटीआयमधून प्राप्त होते. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्याची खरी गरज आहे.


महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व आले आहे. जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. मानवी व्यवहारात सुद्धा आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करून भावी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था करीत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्य बळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे.  हा अभाव भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील  ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सरकारी आयटीआय)  तसेच ५३८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.  


महाराष्ट्रातील एकूण ९५५ आयटीआयमध्ये ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी गटातील ५५ व्यवसाय असून बिगर अभियांत्रिकी गटातील २४ व्यवसाय आहेत. यातील ६८ व्यवसायासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता;  तसेच ११ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी दहावी अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे.


प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, असे भोसले यांनी सांगितले.

डी.एड., बी.एड.धारकांचाही आयटीआयकडे कल
अलिकडच्या आठ ते दहा वर्षात डी.एड., बी.एड. असलेले किंवा विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करतात. काहींना प्रवेश मिळतो. काहींना दहावीत कमी गुण असल्याने प्रवेश मिळू शकत नाही. मात्र ही आजच्या उच्च शिक्षणाची शोकांतिका आहे. म्हणून या घडीला तरी आयटीआय रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी समर्थ पर्याय आहे, असे भोसले यांनी सांगितले.

Web Title: Lokmat Interview: Sandhi-Chandrakant Bhosale in ITI in terms of skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.