लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्यचे अहमदनगरमध्ये जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:40 PM2018-11-21T15:40:17+5:302018-11-21T15:42:36+5:30
लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़ २१) नगरमधून धावत आहे.
लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्यचे अहमदनगरमध्ये जल्लोषात स्वागत
अहमदनगर : लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़ २१) नगरमधून धावत आहे. आज सकाळी जिल्ह्याच्या हद्दीत आदित्यने प्रवेश करताच विविध ठिकाणी त्याचे स्वागत करण्यात आले. पुणे बसस्थानकाजवळ प्रसिध्द उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी स्वागत केले. लोकमत अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनीही स्वागत केले. यावेळी अंबादास हुलगे, गौतम जायभाय, दिनेश भालेराव, विजय कर्णे, अमृत पितळे, योगेश खरपुडे, दिनेश संकलेचा, डॉ. महेश मुळे, डॉ. शाम तारडे, प्रसाद तनपुरे, संदिप जोशी, महेंद्र हिंगे उपस्थित होते.
नगरमधील विविध ग्रुप त्याच्यासोबत धावले. नगर जिल्ह्यात हद्दीत प्रवेश केल्यानंतर पारनेर तालुक्यातील सुप्यात, केडगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. रनिंग संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि लोकमत महामॅरेथॉनची नागरिक, धावपटुंमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आदित्य सोनवणे पुणे ते औरंगाबाद असे २४० किलोमीटर धावणार आहे. आदित्य याने मंगळवारी (दि़२०) पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रनसाठी प्रारंभ केला आहे. आदित्य हा बुधवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील सुपा येथे पोहोचला. तेथे स्वागत झाल्यानंतर माळीवाडा बसस्थानकाजवळील नमो उद्योग समूहाजवळ त्याचे नगर रायझिंग रनर्स ग्रुपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील खेळाडू व क्रीडापे्रमी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य हा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे़ एकलव्य क्रीडा मंडळाचे खेळाडू त्याच्याबरोबर धावले.
सुप्याच्या बसस्थानक चौकात रनरचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक संजयकुमार सोनी, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस सुनील थोरात, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर मैड आदींनी आदित्य सोनवणेचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आपधुपचे उपसरपंच नामदेव गवळी, माजी सरपंच जयसिंग गवळी, किसन गवळी, शहजापूरचे सरपंच अण्णा मोटे उपस्थित होते.