लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे आज नगरमधून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:18 AM2018-11-21T11:18:06+5:302018-11-21T12:09:13+5:30

लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़२१) नगरमधून धावणार आहे.

Lokmat Mahamarethon: Ultra runner Aditya Sonawane will run in the city today | लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे आज नगरमधून धावणार

लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे आज नगरमधून धावणार

अहमदनगर : लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़२१) नगरमधून धावणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच आदित्य याचे विविध ठिकाणी स्वागत उत्साहात होऊन नगरमधील विविध ग्रुप त्याच्यासोबत धावणार आहेत.
रनिंग संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि लोकमत महामॅरेथॉनची नागरिक, धावपटुंमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आदित्य सोनवणे पुणे ते औरंगाबाद असे २४० किलोमीटर धावणार आहे. आदित्य याने मंगळवारी (दि़२०) पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रनसाठी प्रारंभ केला आहे. आदित्य हा बुधवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील सुपा येथे पोहोचणार आहे. तेथे स्वागत झाल्यानंतर माळीवाडा बसस्थानकाजवळील नमो उद्योग समूहाजवळ त्याचे नगर रायझिंग रनर्स ग्रुपतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी डॉ़ सतीश सोनवणे, डॉ़ शाम तारडे, संदीप जोशी, निर्मल थोरात, गौतम जायभाय यांच्यासह शहरातील खेळाडू व क्रीडापे्रमी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य हा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे़ त्यानंतर आदित्य यांच्यासोबत नगर-औरंगाबाद रोडने हॉटेल इंद्रायणीपर्यंत एकलव्य क्रीडा मंडळाचे खेळाडू धावणार आहेत. जेऊर येथे मुक्काम केल्यानंतर आदित्य हा गुरूवारी सकाळी औरंगाबादच्या दिशेने प्रयाण करणार आहे. गुरूवारी रात्री साडेदहा वाजता औरंगाबाद येथील लोकमत भवन येथे आदित्य याचे स्वागत होणार आहे. निरोगी आरोग्यासाठी आदित्य सोनवणे यांच्यासोबत नगरकरांनी रन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Lokmat Mahamarethon: Ultra runner Aditya Sonawane will run in the city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.