‘लोकमत’ अहमदनगरचे कार्यालय आता सौरऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:10 PM2019-01-23T14:10:36+5:302019-01-23T14:11:04+5:30

येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उदघाटन झाले.

 'Lokmat' office of Ahmednagar is now on Solar Power | ‘लोकमत’ अहमदनगरचे कार्यालय आता सौरऊर्जेवर

‘लोकमत’ अहमदनगरचे कार्यालय आता सौरऊर्जेवर

अहमदनगर : येथील ‘लोकमत’च्या कार्यालयात सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रकल्पामुळे ‘लोकमत’चे कार्यालय आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यात सौरऊर्जेवर चालणारे हे वृत्तपत्राचे पहिलेच कार्यालय ठरले आहे.
लोकमत भवनच्या छतावरील मोकळ््या जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. छतावरील बाराशे चौरस फूट जागेत सौरऊर्जा निर्मिती करणारे सोलार पॅनल उभारण्यात आले आहेत. याद्वारे सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर होत आहे.
या प्रकल्पात दररोज आठ किलोवॅट विद्युत ऊर्जा तयार होते. या ऊर्जेवरच ‘लोकमत’चे कार्यालय कार्यान्वित झाले आहे. एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करणारे लोकमत भवन हे जिल्ह्यातील पहिलेच कार्यालय ठरले आहे. पुणे वगळता राज्यातील ‘लोकमत’च्या सर्व आवृत्त्यांच्या कार्यालयातही सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले.
यावेळी ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके व लोकमतमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘लोकमत’चा प्रकल्प कौतुकास्पद-जिल्हाधिकारी
‘लोकमत’ने अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करून पर्यावरणाचेही रक्षण केले आहे. लोकमत भवनमध्ये उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद आहे़ जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर आस्थापनांनाही याचे अनुकरण करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

Web Title:  'Lokmat' office of Ahmednagar is now on Solar Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.