लोकमत सरपंच अवॉर्ड : बेलवंडीच्या सुप्रिया पवार ‘सरपंच आॅफ द इयर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:55 PM2019-02-28T19:55:29+5:302019-02-28T19:55:41+5:30
‘सरपंच खरा, घेई मानाचा तुरा’ या टॅगलाईनबरोबर संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या दुसऱ्या पर्वाचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झाले.
अहमदनगर : ‘सरपंच खरा, घेई मानाचा तुरा’ या टॅगलाईनबरोबर संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या दुसऱ्या पर्वाचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झाले. याप्रसंगी यंदाचा सरपंच आॅफ द इयर हा मानाचा पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावच्या सरपंच सुप्रिया संग्राम पवार यांना प्रदान करण्यात आला. ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १३ सरपंचांना ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले.
बीकेटी टायर्स हे मुख्य प्रायोजक व पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेला हा भव्य सोहळा सुमारे तीन तास चालला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, दिग्दर्शक भाऊराव कºहाडे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, शास्त्रज्ञ अशोक ढगे, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, गुंडेगावचे सरपंच संजय कोतकर, बीकेटीचे महाराष्ट सेल्स मॅनेजर जुबेर शेख, बीकेटीचे जिल्हा वितरक कनवरजित सिंग बंगा उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके व उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविकात लंके यांनी या सोहळ्याचा उद्देश विषद केला. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘लोकमत’ने सन्मानित केलेले विजेते सरपंच
सरपंच आॅफ द इयर
सुप्रिया पवार बेलवंडी, ता. श्रीगोंदा
उदयोन्मुख नेतृत्व
वैभाली आभाळे मढी खुर्द, ता. कोपरगाव
शैक्षणिक सुविधा
सुनंदा भागवत नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर
स्वच्छता
स्वाती न-हे वडनेर, ता. पारनेर
आरोग्य
उषाबाई बर्डे कुरणवाडी, ता. राहुरी
पायाभूत सेवा
धनेश गांगर्डे मांदळी,
ता. कर्जत
जल व्यवस्थापन
कैलास पटारे
डोंगरगण, ता. नगर
वीज व्यवस्थापन
रेखा कात्रजकर
कुसडगाव,
ता. जामखेड
कृषी तंत्रज्ञान
अश्विनी थोरात
पिंंपरी गवळी, ता. पारनेर
रोजगार निर्मिती
गोपीनाथ सोनवणे
वेल्हाळे,
ता. संगमनेर
उदयोन्मुख नेतृत्व
विजय बोरूडे
माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी
पर्यावरण संवर्धन
अनुजा काटे
हिवरेझरे,
ता. नगर
ग्रामरक्षण
भरत बेल्हेकर बेल्हेकरवाडी
ता. नेवासा